नाम भी राजीव था और… सातवांच्या प्रार्थना सभेत प्रियंका गांधींचा हुंदका दाटला

प्रियंका गांधी म्हणाल्या, 'ज्या वयात माझे वडील माझ्यापासून हिरावले गेले त्याच वयात राजीव सातव हेही हिरावले गेले. मनात विचार आला की त्यांचंही नाव राजीवच होतं आणि यांचंही. राजीव गांधींचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचंही वय ४६वर्षे होतं आणि राजीव सातव यांचंही वय ४६वर्षेच होतं. या माणसात एक उज्वल भविष्य, समोर संपूर्ण आयुष्य, देशासाठी काही तरी करण्याची इच्छा आणि क्षमताही होती. त्यांच्या जाण्यामुळे घरातील सदस्य गमावल्याचं दुःख होत आहे.'

    नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राजीव सातव यांच्याविषयी बोलताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना हुंदका दाटून आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांना आम्ही जसं वडील राजीव गांधी यांना वयाच्या ४६व्या वर्षी गमावलं, तसंच राजीव सातव यांनाही ते ४६वर्षांचे असतानाच गमावलंय. त्यांच्या जाण्यानं घरातील सदस्य गमावला आहे, असं मत प्रियंका गांधींनी व्यक्त केलं.

    विशेष म्हणजे हे बोलत असताना त्यांना भावना अनावर झाल्या आणि वडील राजीव गांधी आणि राजीव सातव यांच्याविषयी बोलताना त्यांना हुंदका दाटून आला. त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या राजीव सातव यांच्या ऑनलाईन श्रद्धांजली सभेत बोलत होत्या.

    प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘ज्या वयात माझे वडील माझ्यापासून हिरावले गेले त्याच वयात राजीव सातव हेही हिरावले गेले. मनात विचार आला की त्यांचंही नाव राजीवच होतं आणि यांचंही. राजीव गांधींचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचंही वय ४६वर्षे होतं आणि राजीव सातव यांचंही वय ४६वर्षेच होतं. या माणसात एक उज्वल भविष्य, समोर संपूर्ण आयुष्य, देशासाठी काही तरी करण्याची इच्छा आणि क्षमताही होती. त्यांच्या जाण्यामुळे घरातील सदस्य गमावल्याचं दुःख होत आहे.’