कोरोनाकाळात महिलांवरील अत्याचारात वाढ; नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवाल

गुन्ह्यांची नोंद मोठ्या प्रमाणावर होत असली तरी पोलिस या प्रकरणांचा तपास मंद गतीने करीत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 2021 मध्ये नोंदविण्यात आलेल्या 3508 प्रकरणांपैकी 1369 प्रकरणांची चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नाही तर बलात्कार प्रकरणातील 1120 प्रकरणांचीही चौकशी अद्यापही मंदच आहे. हुंडाबळी प्रकरणांची तर अवस्थाच बिकट झाली आहे. 113 प्रकरणांची तर चौकशीच सुरू झाली नाही. यामुळेच महिला अत्याचाराबाबत पोलिस किती संवेदनशील आहे हे यातून दिसून येते.

    दिल्ली : राजस्थानात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातही नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर राजस्थान पोलिसांनीही गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2021 मध्ये महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याची माहिती दिली. कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारीचा ग्राफ वाढला असला तरी दाखल झालेल्या प्रकरणांचा निपटारा करण्याची गती मात्र मंदच असल्याचे दिसून आले आहे. यावरून भाजपाने राजस्थानातील गहलोत सरकारवर टीकास्त्र सोडले असता, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद डोटासरा यांनी एफआयआरची संख्या वाढली असली तरी गुन्हेगारी वाढण्याशी त्याचा काहीच संबंध नसल्याचा दावा केला.

    नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातही आकडेवारी वाढू शकते त्यामुळे एफआयआरची संख्याही वाढण्याची शक्यता आहे परंतु त्याचा गुन्हेगारी वाढण्याशी काहीच संबंध नाही. केंद्र सरकार कोरोनाकाळात आपले अपयश झाकण्यासाठीच असे आरोप करीत असते. 3508 छेडखानी, 6254 महिलांवर अत्याचार तर 2461 बलात्कार झाले आहेत.

    गुन्ह्यांची नोंद मोठ्या प्रमाणावर होत असली तरी पोलिस या प्रकरणांचा तपास मंद गतीने करीत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 2021 मध्ये नोंदविण्यात आलेल्या 3508 प्रकरणांपैकी 1369 प्रकरणांची चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नाही तर बलात्कार प्रकरणातील 1120 प्रकरणांचीही चौकशी अद्यापही मंदच आहे. हुंडाबळी प्रकरणांची तर अवस्थाच बिकट झाली आहे. 113 प्रकरणांची तर चौकशीच सुरू झाली नाही. यामुळेच महिला अत्याचाराबाबत पोलिस किती संवेदनशील आहे हे यातून दिसून येते.

    नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल जारी होताच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपाने सत्ताधारी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. सत्तेत आल्यानंतर काँग्रेसच्या राज्यात कायदा सुव्यवस्था स्थिती ढासळली असल्याचा आरोप भाजपाने केला. राज्यात गुन्हेगारी वाढली असून महिला बाजारात चैन घालूनही जाऊ शकत नाही, अशी टीका केली. त्यावर प्रत्युत्तर देताना डोटासरा यांनी तक्रारी दाखल झाल्या म्हणजे गुन्हे वाढतीलच असे नाही असे सांगत सारवासारव केली.