जूही चावलाच्या अडचणीत वाढ; 5G प्रकरणी दंड भरण्यात एका आठवड्याची मुदत

दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते की, या प्रकरणात याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केला. हायकोर्टाने पुढे असेही म्हटले की, या प्रकरणात असे दिसते आहे की याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केली गेली आहे, म्हणूनच याची लिंक सोशल मीडियावर शेअर केली गेली.

    दिल्ली : 5G वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञानाला आव्हान देणाऱ्या खटल्याच्या माध्यमातून कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याबद्दल दंड म्हणून 20 लाख रुपये जमा करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला आणि इतर दोन जणांना एक आठवड्याची मुदत दिली आहे.

    दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते की, या प्रकरणात याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केला. हायकोर्टाने पुढे असेही म्हटले की, या प्रकरणात असे दिसते आहे की याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केली गेली आहे, म्हणूनच याची लिंक सोशल मीडियावर शेअर केली गेली.

    न्यायमूर्ती जीआर मिधा यांच्या खंडपीठाने आदेशात म्हटले आहे की, हे आरोप त्रासदायक आहेत. एकीकडे तुम्ही एखादा फालतू अर्ज करता आणि दुसरीकडे, तुम्ही अर्ज मागे घेता आणि किंमत देण्यासदेखील तयार नाही, असे देखील कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणात जूही चावलाचे वकील मित मल्होत्राला यांनी म्हटले होते की, सदरचा दंड हा कोर्टाने रद्द करावा. या विरोधातही याचिका दाखल केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली असून, दंड भरण्यासाठी एका आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे.