भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजार आणि कुपोषणमुक्त होऊ शकतो: नारायण मुर्ती

तब्बल ७०-७५ वर्षांच्या जुन्या देशानं आजवर अनेक महत्वाकांक्षी स्वप्नं पूर्ण केली आहेत. यापुढील काळात येत्या ५० वर्षांत भारत देश विकसीत देश म्हणून ओळखला जावा आणि देशातून गरिबी, आजारपण आणि कुपोषण हद्दपार व्हावं अशी आशा आहे, असं नारायण मुर्ती म्हणाले.

    भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजारपण आणि कुपोषणातून मुक्त होऊ शकतो अशी आपली इच्छा असल्याचं वक्तव्य इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मुर्ती यांनी केलं आहे. हे सोपं काम नसलं तरी प्रत्येकानं याची जबाबदारी स्वीकारुन आव्हानांना सामोरं जावं यातूनच यशस्वी होण्याच्या संधी उपलब्ध होतील, असं नारायण मुर्ती म्हणाले.

    तब्बल ७०-७५ वर्षांच्या जुन्या देशानं आजवर अनेक महत्वाकांक्षी स्वप्नं पूर्ण केली आहेत. यापुढील काळात येत्या ५० वर्षांत भारत देश विकसीत देश म्हणून ओळखला जावा आणि देशातून गरिबी, आजारपण आणि कुपोषण हद्दपार व्हावं अशी आशा आहे, असं नारायण मुर्ती म्हणाले. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ गुवाहटीच्या २३ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.