भारत बंद; जाणून घ्या कोणत्या सेवा असणार सुरु कोणत्या सेवा असणार बंद

मुंबई : शेतकऱ्यांनी सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत भारत बंद पुकारला आहे. विविध राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.  चक्का जाम आंदोलना दरम्यान वस्तु व सेवांच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या काळात दूध, फळ, भाजीपाला यांचीही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. समित्या बंद असल्याने फळ व भाजीपाल्याचा पुरवठाही बंद राहणार आहे.

या काळात दूध, फळ, पालेभाज्या यांची वाहतूक बंद राहणार आहे. मात्र, विवाह सोहळे व अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही अडथळा निर्माण केला जाणार नाही.

बेस्टने आपली सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेचे रिक्षा, टँक्सी  संघटनाही या संपात सहभागी होणार नाहीत. यामुळे बेस्ट बसेस, रिक्षा, टँक्सी वाहतूक सुरु राहणार आहे. कल्याण मधील रिक्षा संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. यामु‌ळे येथे रिक्षा वाहतूक बंद असण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील संवेदनशील मार्गावर एसटी सेवा बंद राहणार आहे.

भारत बंद सकाळी सुरू होईल. याकाळात सर्व व्यवहार बंद राहतील. त्यानंतर दुपारी तीन वाजेनंतर चक्का जाम आंदोलन मागे घेतलं जाणार आहे.