India is a place where vehicles run on petrol and diesel; What is the secret behind this?

नवी दिल्ली : जगभरात अशी अनेक रहस्यमयी ठिकाणी आहेत. जे पाहता आणि ज्यांच्याविषयी ऐकता विश्वासच बसत नाही. भारतातही अशीच काही ठिकाणी आहेत. अशाच एका रहस्यमयी ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल शिवाय वाहने चालतात.

मॅग्नेटीक हिल असे या ठिकाणाचे नाव आहे. भारताच्या लडाखमधील लेह जवळील “सायक्लॉप्स हिल” आहे. क्षेत्राचा लेआउट आणि सभोवतालच्या उतारांमुळे एखाद्या टेकडीचा ऑप्टिकल भ्रम निर्माण होतो. हिल रोड हा एक उताराचा रस्ता आहे. टेकडी रस्त्यावर ऑब्जेक्ट्स आणि कार, जेव्हा ते खरंतर उतारावर फिरत असतात तेव्हा ते गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात चढ चढताना दिसू शकतात. असे या मॅग्नेटीक हिलचे शस्त्रीय वर्णन आहे.

हे ठिकाण अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय़ आहे. इथं रस्त्यांवर वाहनं आपोआपच गती पकडतात. इतकंच नव्हे, तर कोणी आपलं वाहन इथं एका ठिकाणी उभं केलं तर त्यांना ते वाहनही मिळणार नाही. आता हे नेमकं कसं होतं याचा मात्र पत्ता अद्यापही लागलेला नाही.
या पर्वतीय भागात चुंबकीय उर्जेचं प्रमाण जास्त आहे. ज्यामुळं येथे वाहनं 20 किलोमीटर प्रतितास वेगानं खेचली जातात. म्हणूनच या पर्वतीय भागाला मॅग्नेटीक हिल (Magnetic Hill) म्हणून ओळखलं जातं. असं अभ्यासक आणि संशोधकांचे म्हणणे आहे.

इथं गुरुत्त्वाकर्षणाचा नियमही लागू होत नाही. सहसा गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार कोणत्याही वस्तूला धक्का दिला असता ती वस्तू खालच्या दिशेनं ढकलली जाते. पण, या पर्वतीय भागात मात्र य़ाविरुद्धच चित्र दिसतं. म्हणूनच याला ग्रॅविटी हिल म्हणूनही ओळखलं जातं.