India is not suitable for habitation; Low grades given by foreign nationals

‘जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़ियां करती है बसेरा वो भारत देश है मेरा,’ असे एकेकाळी भारताबाबत मोठ्या गर्वाने म्हटले जात होते. मात्र, आता हाच भारत देश वास्तव्य करण्याच्या बाबतीत योग्य नाही, असे परदेशी नागरिकांचे म्हणणे आहे. काम आणि वास्तव्य करण्यासाठी योग्य असलेल्या देशांच्या यादीत भारताला कमी गुणांकन मिळाले आहे. परदेशी नागरिकांनी केलेल्या मुल्यांकनानुसार ‘एक्सपॅट इनसायडर-2021’ने जाहीर केलेल्या यादीतून ही माहिती समोर आली आहे.

  बर्लिन : ‘जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़ियां करती है बसेरा वो भारत देश है मेरा,’ असे एकेकाळी भारताबाबत मोठ्या गर्वाने म्हटले जात होते. मात्र, आता हाच भारत देश वास्तव्य करण्याच्या बाबतीत योग्य नाही, असे परदेशी नागरिकांचे म्हणणे आहे. काम आणि वास्तव्य करण्यासाठी योग्य असलेल्या देशांच्या यादीत भारताला कमी गुणांकन मिळाले आहे. परदेशी नागरिकांनी केलेल्या मुल्यांकनानुसार ‘एक्सपॅट इनसायडर-2021’ने जाहीर केलेल्या यादीतून ही माहिती समोर आली आहे.

  59 देशांच्या यादीत 51 वे स्थान

  भारताला 59 देशांच्या यादीत 51 वे स्थान मिळाले आहे. ही यादी आपला देश सोडून इतर देशात राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी तयार असलेल्या नागरिकांच्या आवडीवर आधारीत आहे. या मुल्यांकनात देशातील राहणीमानाचा स्तर, आर्थिक खर्च, रोजगार, आरोग्य व्यवस्था आदींबाबत प्रश्न विचारण्यात येतात आणि मुल्यांकन केले जाते.

  ‘ही’ आहेत कारणे

  भारतात वास्तव्य करून गेलेल्या परदेशी नागरिकांच्या मते, भारतात वायू प्रदूषण, पाणी आणि स्वच्छतासारख्या पायाभूत सुविधांची परिस्थिती खूपच वाईट आहे. त्यामुळेच भारतात वास्तव्य करणे आमच्यासाठी अधिक आव्हानात्मक ठरले. त्याशिवाय, भारतातील आरोग्य सुविधांच्या कमतरेतबाबतही परदेशी नागरिकांनी आपले मत व्यक्त केले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांपैकी 82 टक्के जणांनी भारतातील आर्थिक स्थितीबाबत समाधान व्यक्त केले.

  तैवान अग्रस्थानी

  कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवणारा तैवान या देशाला परदेशी नागरिकांनी मोठी पसंती दिली आहे. या यादीत सलग तिसऱ्या वर्षी तैवानने पहिले स्थान मिळवले आहे. एक्सपॅटने तैवानचे रोजगार सुरक्षा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचे मोठे कौतुक केले आहे. 96 टक्के लोकांनी तैवानच्या आरोग्य व्यवस्थेचे कौतुक केले. तर, तितक्याच टक्के लोकांनी तैवान हा देश परदेशी नागरिकांसाठी चांगले वातावरण असणारा देश असल्याचे म्हटले आहे.

  अमेरिका 34 व्या स्थानी

  तैवाननंतर मॅक्सिको आणि कोस्टा रिकामध्ये राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी योग्य असल्याचे मत परदेशी नागरिकांनी नोंदवले आहे. या दोन्ही देशांमध्ये राहणे आणि नवीन मित्र करणे हे सोपे वाटले. मलेशिया चौथ्या क्रमांकावर असून पोर्तुगाल पाचव्या स्थानी आहे. तर, अमेरिका 34 व्या स्थानी आहे.

  कुवेतसाठीही हे सर्वेक्षण चांगले ठरले नाही. 47 टक्के लोकांनी कुवेत हा राहण्यासाठी योग्य देश नसल्याचे म्हटले. वाईट अर्थव्यवस्थेचा फटका इटलीलाही बसला असून वाईट देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्थानिक पातळीवर करिअरच्या दृष्टीने फार कमी संधी असल्याचे मत परदेशी नागरिकांनी व्यक्त केले.