लाट ओसरतेय, पण मृत्युचं तांडव सुरूच, २४ तासांत ३४०३ जण कोरोनाने दगावले, जगात सर्वाधिक केसेस भारतातच

गेल्या २४ तासांत देशात ९१, ७०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर ३४०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या काही दिवसांत ही आकडेवारी २ हजारांच्या खाली आली होती. मात्र आता पुन्हा ३ हजारांपेक्षा अधिक मृत्युंची नोंद होत आहे. जगाचा विचार करता आजही सर्वाधिक कोरोना केसेस या भारतातच नोंदवल्या जात आहेत. 

    देशात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं धुमाकूळ घातलाय. मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या या लाटेनं मे महिन्यात कळस गाठला. एका दिवसांत ४ लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण भारतात आढळून येत होते. मे महिन्याच्या उत्तरार्धात ही लाट ओसरायला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून भारतात आढळणाऱ्या दैनंदिन रुग्णांची संख्या १ लाखांच्याही खाली नोंदवली जातेय. मात्र मृत्युचं थैमान अद्यापही सुरूच आहे.

    गेल्या २४ तासांत देशात ९१, ७०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. तर ३४०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या काही दिवसांत ही आकडेवारी २ हजारांच्या खाली आली होती. मात्र आता पुन्हा ३ हजारांपेक्षा अधिक मृत्युंची नोंद होत आहे. जगाचा विचार करता आजही सर्वाधिक कोरोना केसेस या भारतातच नोंदवल्या जात आहेत.

    अर्थात, नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. गेल्या २४ तासांत १,३४,५८० रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. तर आतापर्यंत देशात एकूण २४ कोटी ६० लाख ८५ हजार ६४९ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.

    केंद्र सरकारनं लसीकरणाचं धोरण बदललं असून आता देशातील एकूण लसींपैकी ७५ टक्के लसी केंद्र सरकार खरेदी करेल आणि २५ टक्के लसी खासगी हॉस्पिटल्स खरेदी करतील, असा निर्णय घेण्यात आलाय. जुलैपासून देशाला लसींचा पुरवठा होण्याचं प्रमाण वाढेल आणि लसीकरणाला गती येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.