शहिद जवानांचा भारताला अभिमान, हे बलिदान देश कधीच विसरणार नाही –  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली - लडाखच्या गलवान खोऱ्यात १६ जून २०२० रोजी चीनी सैन्याने घुसखोरी केली. घुसखोरी दरम्यान भारताने प्रत्त्युत्तर दिले. भारतीय जवानांनी चीनच्या ४३ जवानाना ठार केले तर भारताचे २० जवान शहीद

 नवी दिल्ली – लडाखच्या गलवान खोऱ्यात १६ जून २०२० रोजी चीनी सैन्याने घुसखोरी केली. घुसखोरी दरम्यान भारताने प्रत्त्युत्तर दिले. भारतीय जवानांनी चीनच्या ४३ जवानाना ठार केले तर भारताचे २० जवान शहीद झाले. या घटनेवर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.

राजनाथ सिंह यांनी ट्वीट करत म्हटले आहे की 

गलवानमधील सैनिकांना आलेले वीरमरण फारच त्रासदायक आणि वेदनादायक आहे. आमच्या सैनिकांनी कर्तव्याच्या अनुषंगाने अनुकरणीय धैर्य आणि पराक्रम दाखवले आणि भारतीय सैन्याच्या सर्वोच्च परंपरेत आपले जीवन अर्पण केले. त्यांचे शौर्य आणि त्याग राष्ट्र कधीही विसरणार नाही. माझे हृदय या घटनेने पिळवटून गेले आहे. शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटूंबियांच्या दुखात मी सहभागी आहे. या कठीण घडीला राष्ट्र त्यांच्या पाठीशी उभे आहे. आम्हाला व भारताला त्यांच्या शौर्य व धैर्याचा अभिमान आहे.

लडाखमधील भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात चीन्यांनी केलेल्या घुसखोरी आणि भ्याड हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. या भ्याड हल्ल्यात भारताने जोरदार प्रत्युत्तर देत चीन्यांचे ४३ सैन्या मारले आहेत. परंतु चीन ही बातमी मान्य करत नाही आहे. १५ जून ला झालेल्या हल्ल्यात ३ जवान ठार झाले आहेत.