Indian fisherman found in Pakistani jail in Corona's wreckage; 557 Corona to fishermen

भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेल्या अरबी समुद्रात मासेमारी करताना मच्छिमार किंवा इतर कोणीही सागरी सीमा ओलांडून गेल्यास त्याला संबंधित देशांच्या तटरक्षक दलांकडून बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले जाते. 1 जुलै रोजी भारत आणि पाकिस्तानच्या या करारानुसार, भारत आणि पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कैद्यांची यादी देण्यात आली त्यात भारताचे 558 मच्छिमार पाकिस्तान तुरुंगात असल्याची माहिती मिळाली.

    कराची : भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेल्या अरबी समुद्रात मासेमारी करताना मच्छिमार किंवा इतर कोणीही सागरी सीमा ओलांडून गेल्यास त्याला संबंधित देशांच्या तटरक्षक दलांकडून बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले जाते. 1 जुलै रोजी भारत आणि पाकिस्तानच्या या करारानुसार, भारत आणि पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कैद्यांची यादी देण्यात आली त्यात भारताचे 558 मच्छिमार पाकिस्तान तुरुंगात असल्याची माहिती मिळाली.

    त्यातील 300 मच्छिमारांच्या शिक्षेचा कालवधी संपला असून भारताने त्यांचे राष्ट्रीत्व सिद्ध करणारी कागदपत्रे देखील सादर केली आहेत. मात्र तरीही देखील पाकिस्तानकडून त्यांची सुटका करण्यात आलेली नाही. हे भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या जेलमध्ये कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

    कोरोना महामारीत तुरुंगात असलेल्या मच्छिमारांचे कुटुंबीय अत्यंत चिंचेत आहेत. पाकिस्तान सरकारने या मच्छिमारांना मानवतेच्या दृष्टीने मुक्त करावे अशी विनंती पोरबंदर मच्छिमारांचे नेते जीवनभाई जुनगी यांनी केली आहे.