भारतीय जवान पाकिस्तानात २०० मीटर आत घुसले, दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठी वापरलेल्या बोगद्याचा पर्दाफाश

जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये २२ नोव्हेंबर २०२०ला सुरक्षा दालाला आंतरराष्ट्रीय सीमेवर १५० मीटर लांबीचा बोगदा सापडला. सुरक्षा दलाच्या महितीनुसार नगरोटामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांनी याच बोगद्यातून प्रवेश केला होता.

दिल्ली : काही दिवसांपूर्वी नगरोटामधील चकमकीत ज्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हे दहशतवादी ज्या भुयारी बोगद्यातून आले होते. त्याच बोगद्यातून भारतीय सुरक्षा दलाचे जवान (Indian troops ) पाकिस्तानात (Pakistan) २०० मीटर पर्यंत आतमद्ये गेले होते. अशी माहीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाचे जवान पाकिस्तानची सीमा ओलांडून बोगद्यामधून २०० मीटरपर्यत आतमध्ये गेले होते. जिथे या बोगद्याची सुरुवात झाली आहे. याच बोगद्यातून ठार करण्यात आलेले ४ दहशतवाद्यांनी घुसखोरी (terrorists for infiltration) केली होती.

जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये २२ नोव्हेंबर २०२०ला सुरक्षा दालाला आंतरराष्ट्रीय सीमेवर १५० मीटर लांबीचा बोगदा सापडला. सुरक्षा दलाच्या महितीनुसार नगरोटामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांनी याच बोगद्यातून प्रवेश केला होता. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या जवळ एक मोबाईल सापडला होता. याच मोबाईलमुळे बोगद्याचा सुगावा सुरक्षा दलाला लागला होता.

नगरोटा हल्ल्यापूर्वी तयार करण्यात आला भुयारी मार्ग, या बोगद्यात सापडलेल्या पोत्यांवर कराचीचा उल्लेख आहे. सीमा सुरक्षा दलाचे डीजी राकेश अस्थाना यांनी या कारवाईबाबत सांगितले की, ठार झालेल्या अतिरेक्यांजवळ मोबाईल फोन सापडला. या फोनमुळे २२ नोव्हेंबरला या बोगद्याचा सुगावा लागला होता.