टिका जिंदगीका : भारताचा नवा विक्रम एका दिवसांत केलं इतक्या कोटी लोकांचं लसीकरण

    कोरोना महामारिला रोखायचं असेल तर सध्यातरी लसीकरण हा एकच पर्याय आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाकडून प्रभावीपणे लसीकरण मोहिम रावण्यात येत आहेत. प्रशासनच्या मेहतीचा प्रत्याय आता देशातील जनतेला आला कारण, देशातील आरोग्य यंत्रणेने एका दिवसात तब्बल एक कोटी लोकांचे लसीकरण करण्याचा विक्रम केला आहे. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्वीटकरत दिली आहे.

    काय म्हणाले पंतप्रधान मोदी

    देशातील आरोग्य यंत्रणेने केलेल्या या नव्या विक्रमाची माहिती मिळताच पंतप्रधानांनी “आज देशातील आरोग्य यंत्रणेने एका दिवसात कोटी दैनंदिन लसीकरणाचं टार्गेट पूर्ण कोलं आहे. या लसीकरण मोहिमेत लस घेणाऱ्या आणि लसीकरण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन.” अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.

    पंतप्रधानांसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी देखील या लसीकरण मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वंचांचे अभिनंदन करणारे ट्वीट केले आहे.

    केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ६२ कोटी १८ लाखांहून अधिक लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही कोरोना प्रतिबंधक लसीचे ४.०५ कोटींहून अधीक डोस उपलब्ध असून आणखी १७.६४ लाखांवर डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे पोहोचवले जात आहेत.