India's star player Saina Nehwal corona positive; Other Indian badminton players also infected with corona?

भारताची स्टार खेळाडू सायना नेहवाल हिची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समोर आले आहे. थायलंड ओपन २०२१ (YonexThailandOpen2021) स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. पण, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सायना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने भारताला मोठा धक्का बसला.

दिल्ली : भारताची स्टार खेळाडू सायना नेहवाल हिची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समोर आले आहे. थायलंड ओपन २०२१ (YonexThailandOpen2021) स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. पण, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सायना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने भारताला मोठा धक्का बसला.

तिच्यासह भारताच्या आणखी काही खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, परंतु त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. तिसऱ्या कोरोना चाचणीत तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला आहे. तिला हॉटेलमध्ये क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे. तर, सायनाचा पती पारुपल्ली कश्यप याला वैद्यकिय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, या स्पर्धेसाठी बँकॉकमध्ये दाखल झाल्यानंतर कोरोना तपासणी करतानाटा व्हिडिओ तिने ट्विटरवर शेअर केला होता.
यानंतर बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने ट्विट करत सायनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. या कारणामुळे तिच्यासह आणखी एका खेळाडूला स्पर्धेत भाग घेता येणार नाही. यांना दहा क्वारंटाईन राहण्याच्या सल्ला देण्यात आला आहे.