खुशखबर! जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याचे संकेत

जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढविण्यात आला होता. यानंतर दुसऱ्या सहामाहीत (जून 2020) मध्ये यामध्ये पुन्हा तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. आता जानेवारी 2021 मध्ये पुन्हा चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

    कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारच्या (Central government) महसुलावर परिणाम झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्य़ावर रोख लावली आहे. सरकारने जानेवारी 2020 पासून महागाई भत्ता रोखला आहे. जून 2021 पर्यंत याचा एकही रुपया कर्मचाऱ्यांना (Employee) दिला जाणार नाही. ही मुदत संपायला महिना बाकी असताना केंद्राकडून काही संकेत मिळू लागले आहेत.

    जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढविण्यात आला होता. यानंतर दुसऱ्या सहामाहीत (जून 2020) मध्ये यामध्ये पुन्हा तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.

    आता जानेवारी 2021 मध्ये पुन्हा चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. याप्रकारे हा डीए 17 टक्क्यावरून वाढून 28 टक्के झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र, सरकारने यावर गेल्या वर्षी जानेवारीपासून रोख लावली आहे.