प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

भारत आता चीनच्या 45 गुंतवणुकींच्या प्रस्तावांना हिरवी झेंडी दाखविण्याची तयारी करीत आहे. दोन्ही देशांमधील सीमेवरील तणाव निवळत असल्याने या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे सरकारने ठरविले असल्याचे समजते. या गुंतवणूक प्रस्तावात चीनच्या ग्रेट वॉल मोटर आणि एसआयएसी मोटर कॉर्पोरेशनचेही नाव समाविष्ट आहे.

    दिल्ली (Delhi).  भारत आता चीनच्या 45 गुंतवणुकींच्या प्रस्तावांना हिरवी झेंडी दाखविण्याची तयारी करीत आहे. दोन्ही देशांमधील सीमेवरील तणाव निवळत असल्याने या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे सरकारने ठरविले असल्याचे समजते. या गुंतवणूक प्रस्तावात चीनच्या ग्रेट वॉल मोटर आणि एसआयएसी मोटर कॉर्पोरेशनचेही नाव समाविष्ट आहे. उल्लेखनीय असे की, लडाख सीमेवर सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनतर भारताने चिनी गुंतवणुकीविरोधात कठोर धोरण अंगिकारले होते. त्यामुळे दोन्ही देशांमधील जवळपास 2 अब्ज डॉलरचे 150 गुंतवणुकीचे प्रस्ताव प्रलंबित झाले होते.

    उत्पादन क्षेत्रातील कंपन्या
    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 प्रस्तावांपैकी अधिकांश प्रस्ताव उत्पादन क्षेत्रातील आहेत. या यादीत ग्रेट वॉल मोटर आणि एसएआयसी मोटरचेही नाव समाविष्ट असण्याची शक्यता आहे. गेल्याच वर्षी ग्रेट वॉल आणि जनरल मोटर्सने एक प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावानुसार चिनी वाहन निर्माता कंपनी भारतातील अमेरिकन कंपनीचा कारखाना खरेदी करण्यास इच्छुक होती. दोन्ही कंपन्यांमधील या डीलचे मूल्य जवळपास 250-300 मिलियन डॉलर असल्याचे समजते.

    १ अब्ज डॉलर गुंतवणुकीचे लक्ष्य
    पुढील काही वर्षात ग्रेट वॉलने भारतात एक अब्ज डॉलर गुंतवणुकीचे लक्ष्य निश्चित केले आहे. याच वर्षी भारतात वाहन विक्री करण्याची कंपनीची योजना असून यात इलेक्ट्रीक वाहनांचाही समावेश आहे. एसएआयसी ही कंपनी एमजी मोटर्स नावाने 2019 पासूनच वाहनांची विक्री करीत आहे. कंपनीने भारतात 600 मिलियन डॉलर गुंतवणुकीचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यापैकी 400 मिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. अधिक गुंतवणूक करण्यासाठी कंपनी भारत सकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहे.