भारत-पाकमध्ये पुन्हा पेटणार वाद; पाकचा ‘नूर’ बदलला

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीयकडून हा हिरा परत मिळावा या मागणीसाठी पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. कोहिनूर परत आणण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. लाहोर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला 16 जुलै रोजी रोजी आपली भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत.

  लाहोर : जगातील सर्वाधिक लोकप्रिय हिऱ्यांमध्ये समाविष्ट ‘कोहिनूर’ हिऱ्यावरील दाव्यामुळे पुन्हा एकदा भारत – पाकिस्तानमध्ये नव्याने वाद पेटण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा भारताप्रती द्वेष लपून राहिलेला नसून वेळोवेळी तोंडघशी पडल्यानंतर पाकिस्तानचे सत्ताधीश कोलांटउडीही घेत असतात. त्यातच त्यांचा ‘नूर’ही बदलत असतो. त्याचा प्रत्यय कोहिनूरवरील दाव्यावरून पुन्हा एकदा प्रत्ययास आला आहे.

  ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीयकडून हा हिरा परत मिळावा या मागणीसाठी पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. कोहिनूर परत आणण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. लाहोर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला 16 जुलै रोजी रोजी आपली भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत.

  याचिकाकर्ते वकील जावेद इक्बाल यांनी आपल्या याचिकेत म्हटले की, भारत सरकार कोहिनूर हिरा पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने आपल्या प्रयत्नांना अधिक वेग देण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. ब्रिटीशांनी हा कोहिनूर हिरा महाराजा दलीप सिंग यांच्याकडून हिसकावला होता. त्यानंतर लंडन येथे नेण्यात आला.

  इकबाल म्हणाले की, या हिऱ्यावर ब्रिटीश राणीचा कोणताही हक्क नाही आणि तो पंजाबच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे. आपल्याला सांगू की भारत जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यापैकी एक कोहिनूर हिरा परत आणण्याच्या प्रयत्नात आहे. टॉवर ऑफ लंडनमध्ये हा हिरा सध्या प्रदर्शनात आहे. हा हिरा सुमारे 108 कॅरेटचा आहे.

  इक्बाल यांनी याचिकेत म्हटले की, ब्रिटनच्या महाराणीचा या हिऱ्यावर कोणताच अधिकार नाही. हा हिरा पंजाबच्या सांस्कृतिक वारशाचा भाग आहे. कोहिनूर हिरा पुन्हा आणण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. सध्या हा हिरा टॉवर ऑफ लंडनमधील संग्रहालयातील राजमुकुटात आहे. हा हिरा जवळपास 108 कॅरेटचा आहे.

  2010 मध्ये तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन भारत दौऱ्यावर असताना त्यांनी कोहिनूर हिरा पु्न्हा भारताला दिल्यास ब्रिटीश संग्रहालय गर्दी अभावी ओस पडेल असे विधान केले होते. भारत सरकारने सुप्रीम कोर्टात म्हटले होते की, ब्रिटिशांनी हा हिरा बळजबरी नेला नाही, अथवा चोरीदेखील केली नाही. पंजाबच्या संस्थानिकांनी ईस्ट इंडिया कंपनीला हा कोहिनूर हिरा भेट म्हणून दिला होता. हिरा भेट दिला तो काळ स्वातंत्र्यपूर्व काळ होता. त्यामुळे पुरात्व अवशेष आणि कला संपदा अधिनियम 1992 लागू होत नाही.