कोरोनानंतर आता आणखी एका रोगाचे संक्रमण; अनेक राज्यांना घातलाय विळखा

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना आता दिल्लीकरांपुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे. ब्लॅक फंगसच्या केसेसमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. तसेच एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. दिल्लीतील प्रसिद्ध मूलचंद हॉस्पिटलमधील डॉ. भगवान मंत्री यांनी ही माहिती दिली. 37 वर्षाय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्याला ब्लॅक फंगसची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर तो घरीच उपचार घेत होता. तसेच त्याला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. प्रकृती बिघडल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉ. भगवान यांनी दिली. दिल्ली व्यतिरिक्त गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र तसेच अन्य राज्यांत कमी अधिक प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. बंगळुरूमध्ये गेल्या 15 दिवसांत 75 नवे रुग्ण आढळले आहेत.

    दिल्ली : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना आता दिल्लीकरांपुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे. ब्लॅक फंगसच्या केसेसमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. तसेच एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. दिल्लीतील प्रसिद्ध मूलचंद हॉस्पिटलमधील डॉ. भगवान मंत्री यांनी ही माहिती दिली. 37 वर्षाय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्याला ब्लॅक फंगसची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर तो घरीच उपचार घेत होता. तसेच त्याला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. प्रकृती बिघडल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉ. भगवान यांनी दिली. दिल्ली व्यतिरिक्त गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र तसेच अन्य राज्यांत कमी अधिक प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. बंगळुरूमध्ये गेल्या 15 दिवसांत 75 नवे रुग्ण आढळले आहेत.

    या आजाराची तीव्रता पाहता राजस्थान सरकारने ब्लॅक फंगस साथीचा आजार असल्याचे जाहीर केले आहे. आरोग्य विभागाने बुधवारी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. राजस्थान रोगनियंत्रण अधिनियम -2020 च्या कलम 4 अंतर्गत ब्लॅक फंगस साथीचा आजार असल्याचं अधिसूचित केलं गेलं आहे. राजस्थानमध्ये जवळपास 100 जणांना ब्लॅक फंगस झाल्याचे समोर आले आहे. देशातील वाढत्या ब्लॅक फंगस आजाराप्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी चिंता व्यक्त केली होती. राजस्थानमध्ये या रुग्णांच्या उपचारासाठी जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयात एक वेगळा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

    दिल्लीत आतापर्यंत ब्लॅक फंगसचे 150 पेक्षा अधिक प्रकरणे समोर आली आहेत. यात एम्समध्ये आतापर्यंत 23 रुग्ण समोर आले आहेत. तसेच गंगाराम रुग्णालयात 40 आणि बीएलके सुपर स्पेशालिटीसह इतर खासगी रुग्णालयात ब्लॅक फंगसचे अनेक रुग्ण भरती आहेत. गतवर्षीच्या तुलनेत प्रकरणांची संख्या दोन पटीने वाढली आहे. अपोलो रुग्णालयात या आजाराने पीडित रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्यांचे डोळे काढावे लागले. तसेच इतर रुग्णांची सर्जरी करण्यात आली. या आजारावर उपयुक्त औषधांचाही तुठवडा असल्याने डॉक्टरांसमोर अनेक आव्हाने उभी झाली आहेत. डॉ. अमित किशोर यांनी सांगितले की, एका आठवड्यात त्यांनी 10 रुग्णांवर उपचार केला आहे. 5 मधून 4 लोकांची सायनसची सर्जरी करण्यात आली.