नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागला LPG गॅस सिलेंडर, ‘हे’ आहेत नवीन दर, कमर्शिअल सिलेंडरच्या किंमतीत वाढ

तेल मार्केटींग कंपन्यांनी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. गेल्या वर्षाच्या शेवटच्य़ा महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये 2 वेळा घरगुती गॅसच्या किमतीत वाढ झाली होती. विना-सबसिडीचा 14.2 किलोचा LPG सिलेंडर 644 रुपयांवरून 694 रुपयांवर गेला होता. त्यानंतर आता नववर्षाच्या सुरूवातीलाच विना-सबसिडीच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली नसून, कमर्शिअल सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे.

दिल्ली (Delhi).  तेल मार्केटींग कंपन्यांनी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. गेल्या वर्षाच्या शेवटच्य़ा महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये 2 वेळा घरगुती गॅसच्या किमतीत वाढ झाली होती. विना-सबसिडीचा 14.2 किलोचा LPG सिलेंडर 644 रुपयांवरून 694 रुपयांवर गेला होता. त्यानंतर आता नववर्षाच्या सुरूवातीलाच विना-सबसिडीच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली नसून, कमर्शिअल सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे.

डिसेंबर 2020 मध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडरमध्ये 91 रुपयांची वाढ पाहायला मिळाली होती. नोव्हेंबर महिन्यात याच सिलेंडरची किंमत 1290 रुपयाला मिळत होते. त्यात आता 91 रुपयांनी वाढ झाली असून, आता हाच सिलेंडर ग्राहकांना 1381.50 रुपयात मिळणार आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून, सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवरील सबसिडी देखील बंद केली आहे. त्यामुळे सामान्यांना दुहेरी फटका बसत आहे.