white fungus

व्हाइट फंगसमुळे एका महिलेच्या आतड्यांना छिद्रे(hole ti intestine due to white fungus) पडल्याचे दिसून आले आहे.

    नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच आता ब्लॅक आणि व्हाइट फंगसचे रुग्णही वाढले आहेत.  दिल्लीत(Delhi) व्हाइट फंगसचे (White fungus) एक प्रकरण समोर आले आहे. यात व्हाइट फंगसमुळे एका महिलेच्या आतड्यांना छिद्रे(hole ti intestine due to white fungus) पडल्याचे दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे जगातील पहिलेच प्रकरण आहे.

    दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. सर गंगाराम रुग्णालयात ४९ वर्षांच्या एक महिलेला १३ मे २०२१ रोजी इमर्जन्सीमध्ये आणण्यात आले होते. तेव्हा या महिलेच्या पोटात दुखत होते. तसेच उलट्यांसह बद्धकोष्ठतेचाही त्रास होत होता. ती महिला कॅन्सरनेही पीडित असल्याने तिच्यावर केमोथेरपीही झाली होती.

    संबंधित महिलेचे रुग्णालयात सीटी स्कॅन करण्यात आले. तेव्हा तिच्या आतड्यांमध्ये छिद्रे असल्याचे दिसून आले. यानंतर त्या महिलेची ४ तास सर्जरी करण्यात आली. यात या महिलेच्या अन्न नलिका, छोटे आतडे तथा मोठ्या आतड्यांन पडलेली छिद्रे बंद करण्यात आली. तसेच द्रव लिकदेखील थांबविण्यात आले आहे.

    रुग्णालयातील डॉ. अनिल अरोडा यांनी सांगितले, आतड्यातून काढलेल्या तुकड्यांच्या बायप्सीनंतर लक्षात आले, की आतड्यांत व्हाईट फंगस आहे. यामुळे आतड्यांमध्ये फोडांसारखे घाव झाल्याने, अन्न नलिकेपासून छोट्या आणि मोठ्या आतड्यांत छिद्रे पडली होती.

    स्टेरॉयइडच्या वापरानंतर ब्लॅक फंगसमुळे आतड्यांत छिद्र पडल्याची काही प्रकरणं नुकतीच समोर आली आहेत. मात्र, व्हाइट फंगसमुळे कोविड-१९ इन्फेक्शननंतर, अन्न नलिका, छोट्या आणि मोठ्या आतड्यांत छिदे पडण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे, असेही डॉ. अरोडा म्हणाले. तसेच कोविड-१९ अँटीबॉडी लेवल वाढल्याचेही निदर्शनास आले आहे. रक्त तपासणीनंतर शरीरातील व्हाइट फंगस वाढलेला दिसला. आता सर्जरीनंतर रुग्णाची प्रकृती चांगली असून काही दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार आहे.