आंतरराष्ट्रीय विमान फेऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत स्थगिती

भारतात सलग दोन दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदवली जात आहे. दसरा आणि दिवाळीच्या काळात कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलेलं असू शकतं. त्यामुळे डीजीसीएनं आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर असणारे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय़ घेतलाय.

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर असणारे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत वाढवत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

भारतात सलग दोन दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदवली जात आहे. दसरा आणि दिवाळीच्या काळात कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलेलं असू शकतं. त्यामुळे डीजीसीएनं आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर असणारे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय़ घेतलाय.

यापूर्वीच्या नियोजित विमान फेऱ्यांना काही अटी आणि शर्थींसह परवानगी दिली जाईल, असंदेखील डीजीसीएनं स्पष्ट केलंय. मात्र त्यासाठी वेगळी परवानगी घ्यावी लागेल आणि ही सवलत सरसकट सर्व फेऱ्यांना मिळू शकणार नाही, असंही डीजीसीएनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय.