इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, २८० जागांवर भरती ; जाणून घ्या

भरतीसाठी नोटीफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाईटवर ntpccareers.net वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. एनटीपीसीने जारी केलेल्या नोटीफिकेशननुसार या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 21 मेपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची (NTPC Recruitment 2021) अंतिम तारीख 10 जून आहे. त्यामुळं इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

    नवी दिल्ली – नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. इंजिनीअरिंग क्षेत्रातील तरुणांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अर्थात एनटीपीसीमध्ये (NTPC) एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर ट्रेनी (Executive Engineer Trainee) पदासाठी 280 जागांवर भरती करण्यात येत आहे.

    भरतीसाठी नोटीफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाईटवर ntpccareers.net वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. एनटीपीसीने जारी केलेल्या नोटीफिकेशननुसार या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 21 मेपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची (NTPC Recruitment 2021) अंतिम तारीख 10 जून आहे. त्यामुळं इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

    अर्ज काळजीपूर्वक भरावा, त्यात काही त्रुटी आढळल्यास, अर्ज नाकारला जाईल, असं या नोटीफिकेशनमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. या पदासाठी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन या क्षेत्रात इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या आणि गेट परीक्षा (GATE Exam) उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येईल.या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 27 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.