जुहीने 5जी टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधातील याचिका घेतली मागे

    दिल्ली : भारतात 5जी टेक्नॉलॉजी आणण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने थेट भारतात 5जी टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र आता जुहीने आपली याचिका मागे घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.

    जुही चावलाचे वकील दीपक खोसला यांनी दिलेल्या निवेदनानंतर न्यायमूर्ती जयंत नाथ यांनी याचिका मागे घेण्यास परवानगी दिली आहे. जुहीच्या वकीलाने तर्क केला की जुही कधी खटल्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचली नाही, फक्त सिव्हिल प्रक्रियेच्या संहितेच्या अनुषंगाने ते डिसमिस किंवा परत केले जाऊ शकत असल्याचे सांगण्यात आले आहे.