ज्योतिरादित्य सिंदिया काँग्रेसमध्ये असते तर सीएम झाले असते, आता बसलेत मागच्या बाकावर, राहुल गांधींनी दिलं उदाहरण

काँग्रेस पक्षाची रचना लोकशाहीच्या तत्त्वावर आधारित असून तुम्ही संघटना जेवढी मजबूत करता तेवढेच तुम्हीदेखील मजबूत होत जाता, असं राहुल गांधींनी म्हटलंय. ज्योतिरादित्य कामदेखील चांगलं करत होते. लवकरच तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकाल, असं मी त्यांना म्हटलं होतं. मात्र त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आता मुख्यमंत्रीपद दूरच, ते भाजपमध्ये मागच्या बाकांवर ढकलले गेल्याचं निरीक्षण राहुल गांधी पक्षकार्यकर्त्यांसमोर मांडलं. 

    भाजप नेते ज्योतिरादित्य सिंदिया हे जर काँग्रेस सोडून गेले नसते, तर ते मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री बनू शकले असते, असं मत काँग्रेस नेते राहुल गांधींनी व्यक्त केलंय. आता मात्र ते भाजपात मागच्या बाकांवर बसलेले दिसतात, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसमधील तरूण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राहुल गांधी बोलत होते.

    काँग्रेस पक्षाची रचना लोकशाहीच्या तत्त्वावर आधारित असून तुम्ही संघटना जेवढी मजबूत करता तेवढेच तुम्हीदेखील मजबूत होत जाता, असं राहुल गांधींनी म्हटलंय. ज्योतिरादित्य कामदेखील चांगलं करत होते. लवकरच तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकाल, असं मी त्यांना म्हटलं होतं. मात्र त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आता मुख्यमंत्रीपद दूरच, ते भाजपमध्ये मागच्या बाकांवर ढकलले गेल्याचं निरीक्षण राहुल गांधी पक्षकार्यकर्त्यांसमोर मांडलं.

    ज्योतिरादित्य सिंदिया भाजपात असताना कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. त्यासाठी त्यांना काँग्रेसमध्येच परत यावं लागेल, असं विधान करत त्यांनी सिंदिया यांना पक्षात परत येण्याचं एकप्रकारे आवाहनदेखील केलं. ज्योतिरादित्य सिंदिया यांनी भाजपात प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला होता. मात्र भाजपमध्येदेखील त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही. भविष्यात ज्योतिरादित्य पुन्हा काँग्रेस प्रवेश करणार का, अशी चर्चा यानिमित्तानं पुन्हा सुरू झालीय.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी आपल्याला लढायचं असून केंद्र सरकारच्या दबावाला बळी न पडता कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करणं गरजेचं असल्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.