Risk of bird flu Vitamins and Immunity Booster Doses to Strengthen Immunity of 'Kadaknath'; Increased security

कोरोनातून बाहेर पडलेल्यांना खाण्यापिण्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. कडकनाथ रोगप्रतिकारशक्ती क्षमतेत वाढ करण्यास उपयुक्त असून कोरोना काळात डायटमध्ये त्याचा समावेश करावा, असे या पत्रात म्हटले गेले आहे. कडकनाथ कोंबडीचे मांस, अंडी अत्यंत पोषक आणि प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहेत. त्यात जीवनसत्त्वे, झिंक आहे, फॅट कमी आहे आणि कोलेस्टेरॉल नाही.

    दिल्ली : कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींना अथवा कोरोना न झालेल्यांना त्याची लागण होऊ नये यासाठी कडकनाथ कोंबडीचे सेवन फार उपयुक्त असून कडकनाथ इम्युनिटी बुस्टर ठरेल असा दावा मध्यप्रदेशातील झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर व कृषी विज्ञान केंद्राकडून केला गेला आहे. त्यासंदर्भात एक पत्र इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कडे पाठविले गेले आहे. कोरोना झालेल्यांना किंवा कोरोनापासून बचाव होण्यासाठी व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती मजबूत हवी यावर आता एकमत झाले आहे.

    कोरोनातून बाहेर पडलेल्यांना खाण्यापिण्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. कडकनाथ रोगप्रतिकारशक्ती क्षमतेत वाढ करण्यास उपयुक्त असून कोरोना काळात डायटमध्ये त्याचा समावेश करावा, असे या पत्रात म्हटले गेले आहे. कडकनाथ कोंबडीचे मांस, अंडी अत्यंत पोषक आणि प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहेत. त्यात जीवनसत्त्वे, झिंक आहे, फॅट कमी आहे आणि कोलेस्टेरॉल नाही.

    कोरोना लढाईसाठी इम्युनिटी हे सर्वांत प्रबळ हत्यार असून ज्यांची इम्युनिटी चांगली ते कोरोनाला सहज मात देऊ शकतात असे दिसून आले आहे. इम्युनिटी कमी असलेल्यांना हाय प्रोटीन डाएट घेण्याचा सल्ला दिला जात आहे अशावेळी कडकनाथ सेवन एक चांगला पर्याय ठरू शकतो असा या सेंटरचा दावा आहे.