प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने गेल्या अनेक वर्षांपासून फरार असणारा खलिस्तानी दहशतवादी गुरजीत सिंह निज्जर याला अटक केली आहे. दिल्ली विमानतळावरून निज्जरला एनआयएने ताब्यात घेतले. निज्जर हा सायप्रस या देशामध्ये पळून गेला होता. निज्जर हा मुळचा अमृतसरमधील पंडोरी येथील सुखा सिंह गावातील रहिवाशी आहे. फतेहगढ साहिब जिल्ह्यामध्ये दहशतवादी कारवायांसाठी हत्यारे पुरवल्याचा आरोपात निज्जर हा पंजामधील वॉण्डेट आरोपी होता.

दिल्ली (Delhi).  राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने गेल्या अनेक वर्षांपासून फरार असणारा खलिस्तानी दहशतवादी गुरजीत सिंह निज्जर याला अटक केली आहे. दिल्ली विमानतळावरून निज्जरला एनआयएने ताब्यात घेतले. निज्जर हा सायप्रस या देशामध्ये पळून गेला होता. निज्जर हा मुळचा अमृतसरमधील पंडोरी येथील सुखा सिंह गावातील रहिवाशी आहे. फतेहगढ साहिब जिल्ह्यामध्ये दहशतवादी कारवायांसाठी हत्यारे पुरवल्याचा आरोपात निज्जर हा पंजामधील वॉण्डेट आरोपी होता.

निज्जर 19 ऑक्टोबर 2017 रोजी सायप्रसला पळून गेला होता. मात्र, तो दिल्ली विमानतळावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. निज्जरला आता विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून नंतर त्याला मुंबईला आणण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये खलिस्तान प्रकरणामध्ये कट रचण्याचा गुन्ह्यात निज्जर हा प्रमुख आरोपी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी निज्जर, हरपाल सिंह आणि मोइन खान हे सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टीव्ह आहेत. हे तिघेही सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून शीख दहशतवादाला खतपाणी घालत होते. खलिस्तान नावाचा वेगळा देश निर्माण करण्यासाठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न हे तिघे सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून करत होते. हे तिघेही सोशल मीडियावर 1984 च्या ऑप्रेशन ब्लू स्टारचे तसेच पंजाबचे माजी मंत्री बंत सिंग यांची हत्या करणाऱ्या जगतर सिंग हावरा याचे फोटो पोस्ट करून खलिस्तानला समर्थन देणारा मजकूर पोस्ट करायचे.