कुत्र्याला बेदम मारले; पोस्टमन विरोधात पोलिसांनी दाखल केला गुन्हा 

मानवाचे प्राण्यांवर एकापेक्षा एक गंभीर असे अत्याचार केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. हिमाचल प्रदेशच्या ऊना जिल्ह्यातही असाच एक प्रकार घडला आहे. एका तरुणाने कुत्र्याला बेदम मारहाण केल्याचे समोर आले. या प्रकरणाचा व्हीडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    ऊना : मानवाचे प्राण्यांवर एकापेक्षा एक गंभीर असे अत्याचार केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. हिमाचल प्रदेशच्या ऊना जिल्ह्यातही असाच एक प्रकार घडला आहे. एका तरुणाने कुत्र्याला बेदम मारहाण केल्याचे समोर आले. या प्रकरणाचा व्हीडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    ऊनाच्या बंगाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका कुत्र्याला काठीने प्रचंड मारहाण करणाऱ्या, एका पोस्टमनच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या पोस्टमनचे नाव दीपक राठी असून तो हरियाणाच्या भिवानी येथील रहिवासी आहे.

    काही दिवसांपासून तो बंगाणामधील के कोहडरा पोस्टऑफिसमध्ये काम करत आहे. त्याने कुत्र्याला मारहाण केल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हीडिओमध्ये तरुण म्हणतोय की, कुत्रा त्याला चावत होता, त्यामुळे त्याने त्याला मारले.

    हे सुद्धा वाचा