शेअर बाजारातील घसरणीनंतर सोने महागले, जाणून घ्या

आज चांदीचा दर 61 रुपयांनी घसरून 65,730 रुपये प्रतिकिलो होता, मागील व्यापार सत्रात चांदीची किंमत 65,791 रुपये प्रति किलो होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आणि चांदीवरही दबाव पाहायला मिळाला. 

    नवी दिल्लीः जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमती (Gold Rate Today) 253 रुपयांनी महागल्यात, तर दुसरीकडे चांदीची किंमत 61 रुपयांनी घसरली. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा दर दहा ग्रॅम 47,100 रुपयांवर बंद झाला. मागील व्यापार सत्रात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 46,847 रुपये होती.

    आज चांदीचा दर 61 रुपयांनी घसरून 65,730 रुपये प्रतिकिलो होता, मागील व्यापार सत्रात चांदीची किंमत 65,791 रुपये प्रति किलो होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आणि चांदीवरही दबाव पाहायला मिळाला.

    आज 24 कॅरेट सोन्याचा बंद भाव प्रति दहा ग्रॅम 48222 रुपये झाला. चांदीचा बंद भाव प्रति किलो 66980 रुपये होता. आज डॉलरच्या तुलनेत रुपयात तेजी नोंदली गेली आणि ती 27 पैशांच्या जोरावर 74.61 वर बंद झाली.