दुसरी लाट अंतिम टप्प्यात, सलग दुसऱ्या दिवशी १ लाखांपेक्षा कमी रुग्ण, मृत्युंचा आकडाही २ हजाराच्या खाली

देशात गेल्या २४ तासात ९२, ७१२ नवे कोरोना रुग्ण आढळले असून सोमवारच्या तुलनेत हा आकडा काहीसा वाढला आहे. सोमवारी ८६, १६१ रुग्णांची नोंद झाली होती. मात्र कोरोना टेस्टचं प्रमाण वाढल्यामुळे हा आकडा वाढल्याचं सांगितलं जातंय. तर गेल्या २४ तासात १८१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झालाय. सोमवारपेक्षाही ही आकडेवारी कमी आहे. सोमवारी १८६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला होता. 

    देशात मार्च महिन्यापासून सुरू झालेली कोरोनाची दुसरी लाट आता अंतिम टप्प्यात असल्याचं चित्र दिसत आहे. सोमवार आणि मंगळवारी सलग दोन दिवस रुग्णसंख्या १ लाखांच्या आत नोंदवली गेल्यामुळे देशासाठी हा एक प्रकारचा दिलासा मानला जातोय. कोरोनाची लाट ओसरत असून लवकरच ती संपेल, अशी आशा आहे.

    देशात गेल्या २४ तासात ९२, ७१२ नवे कोरोना रुग्ण आढळले असून सोमवारच्या तुलनेत हा आकडा काहीसा वाढला आहे. सोमवारी ८६, १६१ रुग्णांची नोंद झाली होती. मात्र कोरोना टेस्टचं प्रमाण वाढल्यामुळे हा आकडा वाढल्याचं सांगितलं जातंय. तर गेल्या २४ तासात १८१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झालाय. सोमवारपेक्षाही ही आकडेवारी कमी आहे. सोमवारी १८६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला होता.

    देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होत आहे, तर काही राज्यांमध्ये अद्यापही उद्रेकाची स्थिती आहे. मात्र एकूण देशाचा विचार करता पॉझिटिव्हीटी रेट कमी होत असून रिकव्हरी रेट वाढत असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांत निर्माण झालंय.

    दुसरी लाट उतरणीला लागलेली असली तरी ती संपलेली नाही. नागरिकांनी सरकारनं घालून दिलेले नियम पाळणं, मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर करणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.