हुश्श, देशातील दैनंदिन नव्या रुग्णांचा आकडा १ लाखांच्या खाली, ६८ दिवसांचा निचांक, ओसरतेय दुसरी लाट

सोमवारच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार १६१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तब्बल ६८ दिवसांनंतर एक लाखांपेक्षा कमी रुग्णसंख्या देशात नोंदवली गेलीय. तर तब्बल ४९ दिवसांनंतर दैनंदिन मृत्युचा आकडादेखील २ हजारांच्या खाली आलाय. गेल्या २४ तासात १८६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झालाय. 

    देशात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू आहे. ही लाट आता ओसरू लागल्याचं चित्र आहे. दैनंदिन ४ लाखांच्या वर रुग्णांची नोंद करून नवा रेकॉर्ड नोंदवल्यानंतर ही लाट ओसरत असल्याचं चित्र दिसायला सुरुवात झाली होती. त्यानंतर हळूहळू हे आकडे कमी होत गेले आणि आता १ लाखांपेक्षाही कमी रुग्णसंख्येची नोंद झालीय.

    सोमवारच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार १६१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तब्बल ६८ दिवसांनंतर एक लाखांपेक्षा कमी रुग्णसंख्या देशात नोंदवली गेलीय. तर तब्बल ४९ दिवसांनंतर दैनंदिन मृत्युचा आकडादेखील २ हजारांच्या खाली आलाय. गेल्या २४ तासात १८६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झालाय.

    वास्तविक, देशातील टेस्टिंग कमी झाल्याचा हा परिणाम असल्याचंही सांगितलं जातंय. शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी प्रमाणात टेस्ट झाल्याचं दिसून आलंय. शनिवारी देशभरात एकूण ३५ लाख ७० हजार टेस्ट झाल्या होत्या. तर रविवारी १५ लाख ९० हजार टेस्ट करण्यात आल्या. टेस्ट कमी झाल्याचा परिणाम देशाच्या एकूण पॉझिटीव्हीटी रेटवरही दिसला. देशाचा पॉझिटीव्हीटी रेट २.८ वरून थेट ५.४ इतका नोंदवला गेला.

    विकेंडला टेस्टिंगचं प्रमाण वाढत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत हे आकडे वाढू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. मात्र एकूण दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असून देशासाठी ही अत्यंत  दिलासादायक बाब आहे.