नवनीत कौर राणा- नवनीत कौर राणा या खासदार आहेत. आधी तामिळ चित्रपटात काम केल्यानंतर त्यांनी चित्रपट सृष्टीला रामराम ठोकला व राजकीय नेते रवी राणा यांच्याशी विवाह करून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. नवनीत कौर या महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्या आहेत.
नवनीत कौर राणा- नवनीत कौर राणा या खासदार आहेत. आधी तामिळ चित्रपटात काम केल्यानंतर त्यांनी चित्रपट सृष्टीला रामराम ठोकला व राजकीय नेते रवी राणा यांच्याशी विवाह करून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. नवनीत कौर या महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्या आहेत.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती तथा आमदार रवी राणा यांना धमकीचे पत्र आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्या चेहऱ्यावर तू घमंड करते तो चेहरा ॲसिड विद्रूप करून टाकू असे या पत्रात लिहीले आहे. शिवसेनेच्या कथित लेटरहेडवरुन ही धमकी आल्याचा आरोप केला जात आहे. या धमकीच्या पत्रात शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचे नाव नाही.

    नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती तथा आमदार रवी राणा यांना धमकीचे पत्र आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्या चेहऱ्यावर तू घमंड करते तो चेहरा ॲसिड विद्रूप करून टाकू असे या पत्रात लिहीले आहे. शिवसेनेच्या कथित लेटरहेडवरुन ही धमकी आल्याचा आरोप केला जात आहे. या धमकीच्या पत्रात शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचे नाव नाही.

    अज्ञाताने हे पत्र पाठवले आहे. मात्र, हे पत्र शिवसेनेच्या लेटरहेटवर असल्याने याची दखल घेत नवनीत राणा यांनी शिवसेनेनं धमकी दिल्याचा आरोप करत दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हे धमकीचे पत्र शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या इशाऱ्यावर पाठविण्यात आल्याचा दावा राणा यांनी तक्रारीत केला आहे.

    मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, वाढीव वीजबिल अशा अनेक मुद्द्यवर त्यांनी सरकारवर टीका करत या घटकांना न्याय देण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांना एक धमकीचे एक पत्र आले आहे.