आयएमएकडून थेट पंतप्रधान मोदींना पत्र; रामदेव बाबांवर कारवाई करावी

कोरोनावरील उपचारांबाबत जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआरकडून मार्गदर्शक सूचना वेळोवेळी जारी केल्या जात आहेत. सतत संशोधन सुरू आहे. यावेळी कोणताही उपचार उपलब्ध नाही, कारण कोरोना हा एक नवा विषाणू आहे. यापूर्वी याचा अभ्यास कधीच झाला नव्हता. औषधे बदलतच आहेत. परंतु या सर्व बाबींना वेगळी दिशा देताना योग रामदेव यांनी संपूर्ण अ‍ॅलोपॅथी प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

    दिल्ली : आयएमएने आता रामदेव यांच्या वक्तव्यावरून थेट पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. रामदेव बाबांवर कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

    कोरोनावरील उपचारांबाबत जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआरकडून मार्गदर्शक सूचना वेळोवेळी जारी केल्या जात आहेत. सतत संशोधन सुरू आहे. यावेळी कोणताही उपचार उपलब्ध नाही, कारण कोरोना हा एक नवा विषाणू आहे. यापूर्वी याचा अभ्यास कधीच झाला नव्हता. औषधे बदलतच आहेत. परंतु या सर्व बाबींना वेगळी दिशा देताना योग रामदेव यांनी संपूर्ण अ‍ॅलोपॅथी प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

    रामदेव यांनी दिलेले विधान खेदजनक आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आयएमएने सर्वप्रथम आरोग्यमंत्री आणि आता थेट पंतप्रधानांकडे केली आहे.