लॉकडाऊनमुळे अन्य आजारांपासूनही संरक्षण; संशोधनातून माहिती समोर

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून जग लॉकडाऊनमध्ये अडकलेले आहे. कोरोनाच्या एकामागून एक लाटा येत आहेत. आता भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तण्यात आली आहे. त्यामुळे देशातील काही भागात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला तोटा होत असला तरी माणसांच्या आरोग्याला याचा फायदा झाला असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

    दिल्ली : कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून जग लॉकडाऊनमध्ये अडकलेले आहे. कोरोनाच्या एकामागून एक लाटा येत आहेत. आता भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तण्यात आली आहे. त्यामुळे देशातील काही भागात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला तोटा होत असला तरी माणसांच्या आरोग्याला याचा फायदा झाला असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

    ऑक्सफोर्ड विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे न्यूमोनिया, मेंदूज्वर आणि सेप्सिससारख्या विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. संसर्गजन्य रोगाचे तज्ज्ञ आणि प्रोफेसर डेव्हिड मर्डोक यांनी त्यांच्या अभ्यासातून ही माहिती दिली आहे.

    गेल्या चार आठवड्यात न्यूमोनियाच्या रुग्णांची संख्या 67 टक्क्यांनी कमी झाली आहे. आठ आठवड्यापर्यंत ही स्थिती समान राहिली आहे. लोकांचा एकमेकांसोबत कमी संपर्क आल्याने झाला आहे, त्यामुळे श्वसनाच्या जीवाणूंच्या संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय सुविधा वाढल्याने नवे निष्कर्ष समोर आल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

    दरम्यान, 26 देशांच्या रुग्णसंख्येवरून हे संशोधन झाले आहे. त्यात भारतात देखील लॉकडाऊनमुळे परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र आहे तर श्वसनामार्गे न होणाऱ्या आजारांचे प्रमाण कमी झालेले नाही, असेदेखील या संशोधातून सिद्ध झाले आहे.