कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची आवश्यकता, एम्सच्या संचालकांनी मांडली भूमिका

‘एम्स’चे संचालक डॉ. गुलेरिया यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देशातील परिस्थिती, त्यामागील कारणं, नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन आणि कडक लॉकडाऊन लागू करण्याबाबत भूमिका मांडली.

    कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन उपयोगी नसून, विषाणूची साखळी तोडायची असेल, तर कडकडीत लॉकडाऊन लाग करण्याची आवश्यकता आहे, असं गुलेरिया यांनी स्पष्ट केलं.

    ‘एम्स’चे संचालक डॉ. गुलेरिया यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देशातील परिस्थिती, त्यामागील कारणं, नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन आणि कडक लॉकडाऊन लागू करण्याबाबत भूमिका मांडली.

    डॉ. गुलेरिया म्हणाले की, आता तीन गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. पहिली म्हणजे रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं. दुसरी, आक्रमक कार्यपद्धती स्वीकारून रुग्णसंख्या कमी करणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात लसीचं उत्पादन. आपल्याला विषाणू संसर्गाची साखळी तोडावी लागणार आहे. असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.