दिल्लीतला लॉकडाऊन ८ दिवसांनी वाढला, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची महत्त्वाची घोषणा

दिल्लीमध्ये लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांनी घेतला आहे. ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली आहे.

    दिल्लीत कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.त्यामुळे दिल्लीमध्ये लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय(Lockdown of delhi extended by 8 days) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांनी घेतला आहे. ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली आहे.

    कोरोना रुग्णांची वाढती संख्या, कोलमडलेली आरोग्य व्यवस्था आणि ऑक्सिजनचा  तुटवडा या कारणांमुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    दिल्ली सरकारने एका आठवड्याने लॉकडाऊन वाढवल्याने आता १० मे रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू असणार आहेत. गेल्या २ आठवड्यांपासून दिल्लीत लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्याची मुदत सोमवारी सकाळी ५ वाजता संपणार होती. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकारने आणखी आठवडाभर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दिल्लीत लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढवलं आहे’, असं ट्विट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.


    आठवडाभर वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आतापर्यंतचे सर्व निर्बंध लागू असतील. फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे.

    दिल्लीतील काही रुग्णालयांनी उच्च न्यायालयात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी धाव घेतली आहे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची तक्रार या रुग्णालयांकडून केली जात आहे.