सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली

लॉकडाऊनची पूर्वकल्पना देऊन नागरिकांच्या रोजीरोटीची व्यवस्था करत नियमांचे पालन करता आले असते, असेही मत व्यक्त केले. कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जारी करण्यात आलेले दिशानिर्देश तसेच तत्त्वांवर अंमलबजावणी करण्यात हलगर्जीपणामुळे झाल्यामुळे जंगलातील आगीप्रमाणे कोरोना पसरला अशी टीकाही खंडपीठाने केली.

दिल्ली: मार्गदर्शक तत्त्वांअभावी देशात कोरोना वणव्यासारखा पसरला असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. कर्फ्यू वा लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी पूर्वकल्पना द्यायला हवी होती जेणेकरून लोकांनाही त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करण्यास वेळ मिळाला असता, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघाडणी केली. उल्लेखनीय असे की कोरोना महामारीच्या काळात केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन तसचे संपूर्ण कर्फ्यू लावण्याची घोषणा केली होती.

…तर नियमांचे पालन करता आले असते
न्यायमुर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रह्मण्यम यांच्याखंडपीठाने कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन काळात नागरिकांना रोजीरोटीचा प्रश्न उद्भवला. लॉकडाऊनची पूर्वकल्पना देऊन नागरिकांच्या रोजीरोटीची व्यवस्था करत नियमांचे पालन करता आले असते, असेही मत व्यक्त केले. कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जारी करण्यात आलेले दिशानिर्देश तसेच तत्त्वांवर अंमलबजावणी करण्यात हलगर्जीपणामुळे झाल्यामुळे जंगलातील आगीप्रमाणे कोरोना पसरला अशी टीकाही खंडपीठाने केली.

राज्य-केंद्रात सुसंवादच नव्हता
कोरोनावरील उपचार सामान्य़ांना परवडणारे नाहीत तसेच खासगी रूग्णालयांच्या उपचारांवर मर्यादा हवी होती, असेही मत न्यायालयाने व्यक्त केले. कोरोना काळात राज्य आणि केंद्रामध्ये संवाद नसल्याचे म्हणत खंडपीठाने ताशेरे ओढले. राज्याने केंद्राशी सुसंवादाने काम करायला हवे होते असे न्यायालयाने म्हटले. डॉक्टर, परिचारिकांसह पहिल्या रांगेतील आरोग्य कर्मचारी सतत 8 महिन्यापासून कार्यरत असल्याने ते आता थकले आहेत त्यांना विश्रांती देण्यासाठी पर्याय शोधण्याची आवश्यकता आहे असेही मत खंडपीठाने व्यक्त केले.