लोकसभेत पेट्रोल डिझेलवरून गदारोळ, कामकाज उद्यापर्यंत तहकूब

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवर तातडीनं चर्चा घ्यावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. मात्र लोकसभेचं नियोजित कामकाज सोडून अशा प्रकारे आयत्या वेळी या विषयावर चर्चा घेता येणार नसल्याचं लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं. मात्र तरीही पेट्रोल डिझेलच्या मुद्द्यावर चर्चा घेण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. अखेर गोंधळ अनावर झाल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

    संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला कालपासून (सोमवार) सुरुवात झाली. या अधिवेशनात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा विरोधकांनी चांगलाच लावून धरलाय. काल राज्यसभेत या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानंतर आज लोकसभेत याच विषयावरून विरोधकांनी गदारोळ केला.

    पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवर तातडीनं चर्चा घ्यावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. मात्र लोकसभेचं नियोजित कामकाज सोडून अशा प्रकारे आयत्या वेळी या विषयावर चर्चा घेता येणार नसल्याचं लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं. मात्र तरीही पेट्रोल डिझेलच्या मुद्द्यावर चर्चा घेण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. अखेर गोंधळ अनावर झाल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

    अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला कालपासून सुरुवात झालीय. पहिल्या टप्प्यात शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आणि नव्या कृषी कायद्यांच्या विषयावर विरोधक आक्रमक होते. दुसऱ्या टप्प्यात आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरलाय. देशात विविध ठिकाणी पेट्रोल शंभरवर पोहोचलंय, तर डिझेल नव्वदीच्या उंबरठ्यावर उभं आहे. केंद्र सरकारनं पेट्रोलिअम पदार्थांवरील सेस कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाची वेळ बदलण्यात आली होती. आता ती पूर्ववत करण्यात आलीय. आजपासून लोकसभेचं कामकाज सकाळी ११ वाजता सुरू झालं. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कामकाजाची वेळ निर्धारित करण्यात आली आहे. या अधिवेशनात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवला आहे.