कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलचे (सेक्युलर) नेते एच. डी. कुमारस्वामी
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलचे (सेक्युलर) नेते एच. डी. कुमारस्वामी

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलचे (सेक्युलर) नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेससोबत आघाडी करून आपण उद्ध्वस्त झाल्याचा आरोप केला आहे. काँग्रेससोबत हातमिळवणी करून युती सरकार स्थापन केले खरे मात्र मी 12 वर्षांपासून जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास गमवला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. कुमारस्वामी यांच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली असून राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

दिल्ली (Dehli). कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलचे (सेक्युलर) नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेससोबत आघाडी करून आपण उद्ध्वस्त झाल्याचा आरोप केला आहे. काँग्रेससोबत हातमिळवणी करून युती सरकार स्थापन केले खरे मात्र मी 12 वर्षांपासून जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास गमवला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. कुमारस्वामी यांच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली असून राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

सिद्धरामय्यांवर आरोप

काँग्रेसने षड्यंत्र आखले आणि मी त्यात अडकलो. काँग्रेस नेते सिद्धरामैय्या यांनी कट रचून मला अडकवले. भाजपनेही कधी एवढी मोठी फसवणूक केली नाही जेवढी काँग्रेसने केली. भाजपशी चांगले संबंध असते तर आजही मी मुख्यमंत्री असतो. परंतु, काँग्रेसशी आघाडी करून मी सर्व काही गमावलो. – कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री- कर्नाटक

खोटे बोलण्यात पटाईत
कुमारस्वामी यांनी केलेल्या आरोपांवर काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. कुमारस्वामी ‘खोटे बोलण्यात’ पटाईत आहेत आणि भावूक होऊन अश्रू वाहणे ही त्यांची जुनी सवय आङे, अशी बोचरी टीका सिद्धरामैय्या यांनी कुमारस्वामींवर केली आहे. जेडीएसला केवळ 37 जागा मिळाल्या होत्या, तरीसुद्धा त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवून आमची चूक झाली का? असा सवाल देखील सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला आहे.