Lottery for Rane, Kapil, Karda, Indians! He will use the ministerial post in Maharashtra as a weapon against Chief Minister Uddhav Thackeray

पंतप्रधान मोदींनी मिशन 2024 अंतर्गत ‘परफॉर्मनन्स’ न दाखविणाऱ्या मंत्र्यांना विश्रांती देत नव्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. मोदी कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. या मंत्र्यांच्या माध्यमातून मराठा, ओबीसी व आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला जाईल. तथापि विदर्भातून मात्र कोणत्याही खासदाराचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला नाही.

  मुंबई : केंद्रातील मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील भाजपा नेते व खासदार नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार व भागवत कराड यांचा समावेश झाला आहे. या सर्व खासदारांना मंत्री बनविण्यात आले. तर मोदी कॅबिनेटमधून प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे व संजय धोत्रेंना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.

  पंतप्रधान मोदींनी मिशन 2024 अंतर्गत ‘परफॉर्मनन्स’ न दाखविणाऱ्या मंत्र्यांना विश्रांती देत नव्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. मोदी कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. या मंत्र्यांच्या माध्यमातून मराठा, ओबीसी व आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला जाईल. तथापि विदर्भातून मात्र कोणत्याही खासदाराचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला नाही.

  नारायण राणे

  केंद्रीय मंत्रिपद देत त्यांचा वापर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात अस्त्राप्रमाणे केला जाईल. मुंबई मनपाच्य निवडणुका जिंकण्याचा चंग भाजापने बंधला आहे त्यात कोकणी मुंबईकरांना राणे भाजपाकडे अधिक वळवू शकतील. मराठा आंदोलनाचा एक चेहरा म्हणूनही राणे आहेत. आरक्षणासंदर्भात पहिला अहवाल त्यांनीच केला होता. आरक्षणाच्या मुद्यावर राणेंचा भाजप वापर करेल. कोकणात शिवसेनेविरोधात उपयोग करण्यावर भर असेल.

  कपील पाटील

  कपिल पाटील ठाण्यातील भिवंडी येथील खासदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. ओबीसी समाजाचे ते नेते आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून ते दोनवेळा खासदार झाले.
  उपयोग : दि. बा . पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे यासाठी आगरी समाज आग्रही व आक्रमक होत असताना पाटील यांना मंत्रीपद देणे शिवसेनेला हे आणखी एक आव्हान आहे. महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्यावर जबाबदारी सोपविली जाईल. या भागात शिवसेना नेते व कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेंचा वरचष्मा आहे. पाटील हे शिंदेंना आव्हान देऊ शकतात.

  भागवत कराड

  औरंगाबदचे माजी महापौरही होते. ते गोपीनाथ मुंडे यांच्या वंजारा या जातीतून येतात. व्यवसायाने डॉक्टर आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे ते नीकटवर्तीय समजले जातात. महाराष्ट्रात ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न. औरंगाबाद येथे शिवसेनेशिवाय ओवेसींच्या एआयएमआयएमलाही आव्हान देणार.

  डॉ. भारती पवार

  2019 मध्ये भाजपात त्यानंतर थेट दिंडोरी येथून खासदारकी मिळविली. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक येथील सुशिक्षित व आदिवासी चेहरा. व्यवसायाने डॉक्टर आहेत. नाशिक ते नंदुरबार या आदिवासी पट्यात आदिवासी व्होट बँक मजबूत होऊ शकेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अर्जुन पवार यांच्या त्या सून आहेत.