महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये म्युकरमायकोसिस (काळ्या बुरशीचे) रुग्ण सर्वाधिक- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे रुग्णांच्या शरीरात या बुरशीचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये काळ्या बुरशीचा संसर्ग झालेली रुग्णसंख्या सर्वाधित महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आढळून आली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ६३३९ तर गुजरातमध्ये ५४८६ एवढे रुग्ण आढळून आले आहेत.

    नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट कमी होत असतानाच दुसरीकडे कोरोना रुग्णांमध्ये काळ्या बुरशीचे (ब्लॅक फंगस) प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे. कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे रुग्णांच्या शरीरात या बुरशीचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये काळ्या बुरशीचा संसर्ग झालेली रुग्णसंख्या सर्वाधित महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आढळून आली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ६३३९ तर गुजरातमध्ये ५४८६ एवढे रुग्ण आढळून आले आहेत.

    केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात काळी बुरशीचे (म्युकरमायकोसिस) २८ हजार २५२ केसेस आढळून आल्या आहेत. यातील ८६ टक्के अर्थात २४ हजार ३७० रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर, १७ हजार ६०१ रुग्णांना मधुमेहाचा आजार होता. देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होता असून दिल्लीत संसर्गाचा दर हा अर्ध्या टक्‍क्‍यांहूनही कमी झाला आहे. तर, १५ राज्यांमध्ये अजूनही संक्रमण १० टक्‍क्‍यांच्या आसपास आहे.

    कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीची बैठक केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली पारपडली आहे. या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय आवास आणि शहर विकासमंत्री हरदीप पुरी, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्‍विनीकुमार चौबे उपस्थित होते.