महाराष्ट्र, केरळने वाढवली चिंता; शंभरचे दोनशे रुग्ण झाले

देशात 73 असेल जिल्हे आहेत जिथे प्रत्येक दिवशी 100 हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. हीच संख्या 2 जून रोजी 262 जिल्हे आणि त्यापूर्वी 4 मे रोजी 531 जिल्हे अशी होती. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे.

    दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे, ही चांगलीच बाब आहे. मात्र अद्यापही काही राज्यांत कोरोना संक्रमणाची गती चिंताजनक आहे. महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांत देशातील एकूण रुग्णसंख्येपैंकी 50 टक्यांहून अधिक रुग्ण दिसून येत असल्याचे मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधोरेखित केले. देशात सध्या 4.31 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रिकव्हरी रेट 97.3 टक्क्यांवर आहे.

    देशात 73 असेल जिल्हे आहेत जिथे प्रत्येक दिवशी 100 हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. हीच संख्या 2 जून रोजी 262 जिल्हे आणि त्यापूर्वी 4 मे रोजी 531 जिल्हे अशी होती. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे.

    परंतु, महाराष्ट्र आणि केरळसहीत पाच राज्य, असे आहेत जिथे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण केवळ महाराष्ट्र आणि केरळमधून समोर येत आहेत. याशिवाय तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांतही रुग्णांची संख्या जास्त आहे.