पंजाब सीमेवर सुरक्षा दलाची मोठी कारवाई, ५ पाकिस्तानी घुसखोऱ्यांना कंठस्नान

बीएसएफच्या १०३ बटालियनच्या जवानांनी भारत-पाकिस्तान सीमेजवळील दाल सीमा चौकीवर संशयास्पद हालचाली बघितल्या. त्यानंतर पहाटे ४:४५ वाजता त्यांनी गोळीबार केला. घुसखोरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. शोधमोहीम सुरू आहे.

पंजाब : पंजाबच्या सीमेवर सुरक्षा दलाने पाच पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले आहेत. सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ ) तरण तारणच्या खेमकरन मध्ये ही मोठी कारवाई केली आहे . मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. संपूर्ण भागात सर्च ऑपरेशन सुरू आहे.