प्रसारमाध्यमांमध्ये फसवणूक करणारा असा उल्लेख होत असल्याने मल्ल्याने व्यक्त केली जाहीर नाराजी

टीव्ही पाहत असून वारंवार माझा उल्लेख फसवणूक करणारा असा केला जात आहे. किंगफिशर एअरलाइनवर असलेल्या कर्जापेक्षा जास्त मालमत्ता ईडीने जोडली आहे, तसंच अनेक वेळा मी १०० टक्के रक्कम परत करण्यासाठी ऑफर दिली आहे याचा कोणीच विचार करत नाही का? कुठे आहे फसवणूक?”, - विजय मल्ल्या

    दिल्ली: चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना असा काहीसा प्रकार आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या बाबतीत अनुभवास आला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये फसवणूक करणारा असा उल्लेख होत असल्याने मल्ल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

    “टीव्ही पाहत असून वारंवार माझा उल्लेख फसवणूक करणारा असा केला जात आहे. किंगफिशर एअरलाइनवर असलेल्या कर्जापेक्षा जास्त मालमत्ता ईडीने जोडली आहे, तसंच अनेक वेळा मी १०० टक्के रक्कम परत करण्यासाठी ऑफर दिली आहे याचा कोणीच विचार करत नाही का? कुठे आहे फसवणूक?”, असे विजय मल्ल्याने ट्वीट करत म्हटलं आहे .

    यादरम्यान पीएमएलए कोर्टाने कर्ज वसूल करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांना विजय मल्ल्याची संपत्ती विकण्यास परवानगी दिली आहे. ही संपत्ती ईडीने जप्त केली असून १ जन रोजी हा निकाल दिला आहे. या सर्व घडामोडीं दरम्यान होणाऱ्या चर्चेवर विजय मल्ल्याने नाराजी जाहीर केली आहे.

    सद्यस्थितीला पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावून पसार झालेल्या मेहुल चोक्सीला पुन्हा भारतात आणण्यासाठी सध्या सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. डोमिनिकामध्ये अटकेत असलेल्या मेहुल चोक्सी प्रकरणावर सध्या तेथील कोर्टात सुनावणी सुरु असून यावेळी त्याचं भारतात प्रत्यार्पण व्हावं यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.