माल्या, नीरवच्या अडचणीत वाढ; जप्त संपत्तीवरही द्यावा लागणार कर

बँकांची कोट्यवधींनी फसवणूक करून देशाबाहेर पळ काढणाऱ्या विजय माल्या आणि नीरव मोदीसारख्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. बँकांनी थकित कर्ज वसुलीसाठी त्यांची मालमत्ता, शेअर, पेटिंग्स आणि अन्य मालमत्तांची व्करी सुरू केली आहे. तथापि, जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, यावरील कर भरण्याची जबाबदारी बँकांची नसेल. याचाच अर्थ या मालमत्तांवरील भांडवली कर अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या कराचा भरणा संबंधित मालमत्ताधारकालाच करावा लागणार आहे.

    दिल्ली : बँकांची कोट्यवधींनी फसवणूक करून देशाबाहेर पळ काढणाऱ्या विजय माल्या आणि नीरव मोदीसारख्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. बँकांनी थकित कर्ज वसुलीसाठी त्यांची मालमत्ता, शेअर, पेटिंग्स आणि अन्य मालमत्तांची व्करी सुरू केली आहे. तथापि, जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, यावरील कर भरण्याची जबाबदारी बँकांची नसेल. याचाच अर्थ या मालमत्तांवरील भांडवली कर अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या कराचा भरणा संबंधित मालमत्ताधारकालाच करावा लागणार आहे. गहान ठेवण्यात आलेल्या कोणत्याही मालमत्तेवर मालमत्ताधारकाचा हक्क असतोच त्याचप्रमाणे कर भरण्याची जबाबदारीही त्याचीच असते असते, असे सुप्रीम कोर्टानेही आदेश दिल्याचा दाखला जाणकारांनी दिला.

    मालमत्ता विकण्यास परवानगी

    जून महिन्यात विशेष पीएमएलए कोर्टाने बँकांना 5646 कोटी रुपयांची मालमत्ता विकण्याची परवानगी दिली होती. यात काही बंगले आणि शेअर्सचा समावेश होता.जेव्हाकि रिअल इस्टेटची जेव्हा विक्री केली जाते तेव्हा त्यावर भांडवली कर आकारला जातो. दरम्यान आयकर विभागानेही या प्रकरणात चौकसी सुरू केली असून ज्यांच्या मालमत्तांची विक्री करण्यात आली अशा डिफॉल्टर्सलाही नोटीसी बजावण्यात येणार आहे. ज्या बँकांनी प्रमोटर्सपासून व्यक्तिगत हमी घेतली होती त्यांच्याकडूनही थकित वसुलीसाठी बँगा तगादा लावणार आहे.