Mamata Banerjee

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना जबरदस्त झटका बसला आहे. ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर CBI ने धाड टाकली आहे. सीबीआयने समन्स जारी करत २४ तासांच्या आत हजर होण्याचे आदेश जारी केले आहेत.

    दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना जबरदस्त झटका बसला आहे. ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर CBI ने धाड टाकली आहे. सीबीआयने समन्स जारी करत २४ तासांच्या आत हजर होण्याचे आदेश जारी केले आहेत.

    अभिषेक बॅनर्जींची पत्नी आणि ममता बॅनर्जींची सून रूजीरी बॅनर्जी यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. याचबरोबर सीबीआयकडून अभिषेक बॅनर्जींना समन्स देखील जारी करण्यात आलं आहे, त्यानुसार त्यांना २४ तासांच्या आत चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिलेत.

    कोळासा तस्करी चौकशीप्रकरणी सीबीआयने रुजीरा बॅनर्जी यांना नोटीस बजवण्यात आली आहे. या प्रकरणी सीबीआयने अभिषेक बॅनर्जींच्या अनेक निकटवर्तींविरोधात छापेमारी करत चौकशी केली आहे. मात्र, रुजीरा यांना प्रथमच नोटीस बजावण्यात आली आहे.

    दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. भाजपा व तृणमूल काँग्रेसमधील राजकीय वाद शिगेला पोहचला आहे.