sonia and rahul gandhi

बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने हॅट्रिक लगावली आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद राष्ट्रीय पातळीवरील राजकारणातही पाहायला मिळू शकतात, हे नाकारता येऊ शकत नाही. राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहिले असता पहिल्या नजरेत दिसते की, ममता बॅनर्जीच्या हॅट्रिकचे थेट टेन्शन राहुल गांधी यांना येऊ शकते.

  दिल्ली : बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने हॅट्रिक लगावली आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद राष्ट्रीय पातळीवरील राजकारणातही पाहायला मिळू शकतात, हे नाकारता येऊ शकत नाही. राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहिले असता पहिल्या नजरेत दिसते की, ममता बॅनर्जीच्या हॅट्रिकचे थेट टेन्शन राहुल गांधी यांना येऊ शकते.

  कर्नाटकात काँग्रेस व जेडीएसने मिळून सरकार बनविले होते, त्यावेळी विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेते एका मंचावर येऊन भाजपासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व विरोधी पक्ष नेत विखुरले गेले होते. त्यानंतर सतत विरोधी पक्षात नेतृत्व व सर्वमान चेहऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या हॅट्रिकनंतर मतता विरोधी पक्षाचा सर्वांत मोठा चेहरा बनेल, हे नाकारता येऊ शकणार नाही.

  विरोधी पक्षात ममताच्या टक्करचे कोणीही नाही

  विरोधी पक्षात नेतृत्वाच्या चेहऱ्याचा शोध घेतला, तर पहिले नाव राहुल गांधी यांचे येते. राहुल गांधींच्या नावे कोणतीही विशेष कामगिरी नाही. सलग दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. याशिवाय राहुल गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने कोणत्याही विधानसभेत निवडणुकीत चांगला विजय नोंदविलेला नाही. याशिवाय राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने राजस्थान, मध्यप्रदेश व कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही कसेबसे सरकार बनविण्यात यश मिळविले होते. यापैकी मध्यप्रदेश व कर्नाटकमध्ये काही महिन्यांनंतर भाजपा सत्तेत आली. याशिवाय राजस्थानमध्येही अशोक गहलोत व सचिन पायलट यांच्यात तणावाची परिस्थिती आहे. यामुळे जनतेत स्पष्ट संकेत गेले आहेत की, राहुल गांधी सत्तेत असूनही आपल्या आमदारांमध्ये एकजूट ठेवण्यात सक्षम नाहीत.

  राहुलशिवाय इतर चेहऱ्यांवर नजर टाकली असता सपा प्रमुख अखिलेश यादव, बसपा प्रमुख मायावती, जेडीएसचे मुख्य एचडी कुमारस्वामी, डाव्या पक्षाचे सीताराम येचुरीसहित सर्व नेत्यांमध्ये असे कोणीही नाही जे भाजपाला आपली ताकद दाखवू शकते. फक्त ममता बॅनर्जीच अशा आहेत, ज्या थेट स्पर्धेत भाजपाला परास्त करताना दिसत आहे.
  मोदींच्या ललकारीला ममतांचे सडेतोड उत्तर

  बंगाल विधानसभा निवडणूक प्रचार असो किंवा कोणताही राष्ट्रीय मुद्दा असो, तमाम मुद्यांवर ममता बॅनर्जी विरोधी पक्षातील एकमेव अशा नेत्या आहेत ज्या सरळ-सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत आल्या आहेत. पंतप्रधान मोदी ज्याप्रकारे भाषणातून विरोधकांवर शरसंधान करतात, त्याच आविर्भावात ममता बॅनर्जीदेखील भाजपा नेत्यांवर प्रहार करताना पाहायला मिळतात. कलम ३७० पासून एनआरसी, सीबीआयची राज्यांमधील कारवाई, माँ दुर्गामूर्तीचे विसर्जन, जय श्रीरामची घोषणा इत्यादी मुद्यांवर ममतांनी मजबुतीने भाजपावर निशाणा साधत आल्या आहे.

  हिंदू-मुस्लिम मुद्यावरही ममतांची टक्कर

  बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून टीएमसीवर आरोप करण्यात आले की, हा पक्ष तुष्टीकरणाचे राजकारण खेळते. याच्या उत्तरात ममतांनी निवडणुकीच्या मंचावरून स्वत:ला शांडिल्य ब्राह्मण सांगितले व माँ दुर्गाचा पाठ करून दाखविला. एवढेच नाही तर ममतांनी मुस्लिम मतदारांनादेखील उघडपणे पाठिंबा दिला. याचच अर्थ ममता भाजपाला हा संदेश देण्यात यशस्वी झाली आहे की, त्यांची झेप ना फक्त मुस्लिमांपर्यंतच पण हिंदूंकडेही आहे.
  विरोधी पक्षाचा चेहरा बनू शकले नाहीत नितीश

  २०१५  च्या विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव व नितीश कुमार यांनी हातमिळवणी करत जबरदस्त विजय संपादन केला होता. तेव्हा अशी चर्चा होती की, नितीश कुमार केंद्रात विरोधी पक्षाचा चेहरा बनू शकतात. परंतु सुमारे एका वर्षानंतर ते पुन्हा एनडीएमध्ये सहभागी झाले. यामुळे विरोधी पक्षात सतत सर्वमान्य चेहऱ्याचा शोध अजूनही सुरूच आहे.

  राहुलला स्थापित करण्यासाठी काय करणार सोनिया?

  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राहुलला विरोधी पक्षाचा चेहरा बनविण्याचा सतत प्रयत्न करीत आहे. परंतु ममतांच्या हॅट्रिकनंतर असे होण्याची शक्यता कमी होतान दिसत आहे. कारण बंगालसोबत आसाम, केरळ, पद्दुचेरी व तामिळनाडूमध्येदेखील विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. या राज्यांमध्येही काँग्रेसची ताकद दिसून आली नाही. अशातच २०१४ पासून निवडणुकीत सतत पराभवाचे तोंड पाहणाऱ्या काँग्रेस व सोनिया गांधी कशाप्रकारे आपल्या मुलाला विरोधी पक्षाचा सर्वमान्य चेहरा स्थापित करतील? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यासाठी सोनिया गांधी कोणत्या योजना बनवतील हेही पाहावे लागेल.