Massive performance in the war against the Corona; 3000 hours, 20 lakh km. Travel and more than 1500 flights

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानात ढासळलेली आरोग्य यंत्रणा सावरण्यासाठी विदेशातूनही मदतसामग्री मागवावी लागली. कोरोना साथरोगाच्या दीड महिन्यांच्या काळात भारतीय वायुदल संकटमोचक ठरले. संकटकाळात वायुदल 24 तास सज्ज होते. कोरोनाविरोधात ही लढाई अधिक मजबूत करीत वायुदलाच्या मालवाहतूक दलाच्या जवानांनी देशाच्या विविध भागात आरोग्य संबंधित सामग्री पोहोचविण्यासाठी अहोरात्र श्रम केले. या विदेशी वस्तूंमध्ये जीवनरक्षक वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजन सिलिंडरचाही समावेश होता. वायुदलाने पोहोचविलेल्या मदत सामग्रीमुळे देशातील अनेक भागात कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासही मदत झाली आहे.

    दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानात ढासळलेली आरोग्य यंत्रणा सावरण्यासाठी विदेशातूनही मदतसामग्री मागवावी लागली. कोरोना साथरोगाच्या दीड महिन्यांच्या काळात भारतीय वायुदल संकटमोचक ठरले. संकटकाळात वायुदल 24 तास सज्ज होते. कोरोनाविरोधात ही लढाई अधिक मजबूत करीत वायुदलाच्या मालवाहतूक दलाच्या जवानांनी देशाच्या विविध भागात आरोग्य संबंधित सामग्री पोहोचविण्यासाठी अहोरात्र श्रम केले. या विदेशी वस्तूंमध्ये जीवनरक्षक वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजन सिलिंडरचाही समावेश होता. वायुदलाने पोहोचविलेल्या मदत सामग्रीमुळे देशातील अनेक भागात कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासही मदत झाली आहे.

    पालम विमानतळावर व्यवस्थापन केंद्र

    दिल्लीतील पालम विमानतळावर कोविड-19 व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून जगभरातून ऑक्सिजन सिलिंडरपासून व्हेंटिलेटर तसेच वैद्यकीय उपकरणे देशात येतात. याच केंद्रातर्फे ही सामग्री देशाच्या विविध भागात पोहोचविली जाते. हे काम एखाद्या मोहीमेप्रमाणे कमीत कमी कालावधीत पार पाडले जाते. एप्रिल महिन्यापासून 24 तास वायुदल हे काम करीत आहे. भारतीय वायुदलाच्या सी 17 विमानांनी तब्बल 35 तास सतत उड्डाण केल्यामुळेच ब्रिटनपासून चेन्नईपर्यंत 37 टन ऑक्सिजन पोहोचविणे शक्य झाले.

    जे कार्य आम्हाला सोपविण्यात आले होते ते निश्चित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आम्ही विशेष मोहीम आखली. कोणत्याहीवेळी आम्ही सज्ज असतो. गेल्यावेळी वायुदलाने ज्या पद्धतीने देशासाठी काम केले ते आमच्यासाठी अविस्मरणीय असते. यामुळेच आम्ही देशवासियांपर्यंत मदत पोहोचवू शकतो. जोपर्यंत देशातील शेवटचा व्यक्ती कोविडमुक्त होत नाही तोपर्यंत आमचे प्रयत्न सुरूच राहतील.

    एम. रानडे, एअर व्हाईस मार्शल