‘एमडीएच’ मसालेचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
‘एमडीएच’ मसालेचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आज भारतातच नव्हे तर जगभरात ‘एमडीएच’ मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे.

दिल्ली : मसाल्यांचा किंग म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं आज पहाटे साडेपाचच्या सुमारास निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. आज पहाटे वृद्धापकाळानं हृदय बंद पडल्याने त्यांचं निधन झालं. गुलाटी यांच्या निधनामुळे भारताने एक अनुभवी आणि यशस्वी उद्योजक गमावल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहे.

महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. त्यानंतर मसाल्यांचा उद्योग त्यांनी सुरु केला. आज भारतातच नव्हे तर जगभरात ‘एमडीएच’ मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे.

चुन्नीलाल गुलाटी यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘एमडीएच’ कंपनीने मसाल्याच्या पदार्थांमध्ये बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतात मसाल्यांच्या १५ कंपन्या आहेत. हजारच्या वर पुरवठादार आणि ४ लाख घाऊक विक्रेते एवढं मोठं जाळं एमडीएचने विस्तार केला असून अमेरिका, कॅनडा, जपान, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड, युरोप, दक्षिण पूर्व आशिया, सौदी अरेबिया आदी देशांत ६२ हून अधिक उत्पादनांची विक्री होते. अवघ्या १५०० रुपयांत सुरु झालेला हा व्यवसाय आज कोट्यांवधींची उलाढाल करतोय. महाशय धरमपाल गुलाटी यांचे पुत्र राजीव गुलाटी आता व्यवसायाचा हा गाडा समर्थपणे पुढे नेत आहेत.

२०१९ साली गुलाटी यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म विभूषण प्रदान करुन सन्मानित करण्यात आलं होतं. गुलाटी हे त्यांच्या वैयक्तिक कमाईतील ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा दान म्हणून द्यायचे. यापूर्वीही अनेकदा गुलाटी यांच्या मृत्यूसंदर्भातील अफवा इंटरनेटवर व्हायरल झाल्याचे पहायला मिळालं होतं. काही महिन्यांपूर्वीच गुलाटी यांच्या निधानाचे वृत्त सोशल मीडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनीच आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे पत्रक काढून सांगितलं होतं.