Meeting between BJP MP Udayan Raje and NCP President Sharad Pawar; First visit after leaving NCP

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच उदयनराजे आणि शरद पवांची भेट होणार आहे. या भेटीच्या वृत्तामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

    दिल्ली : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच उदयनराजे आणि शरद पवारांची भेट होणार आहे. या भेटीच्या वृत्तामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

    गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी ही भेट होणार आहे. मात्र, ही भेट नेमकी कशासाठी होणार आहे. यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. उदयनराजे पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेणार असल्याने या भेटीला विशेष महत्त्व आहे.

    उदयनराजे भोसले यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवली. पण ते पराभूत झाले आहेत.