मेहबुबा मुफ्ती
मेहबुबा मुफ्ती

दिल्ली (Dehli) : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांची मंगळवारी रात्री कैदेतून सुटका करण्यात आली. कैदेतून सुटताच मेहबुबा यांनी काश्मीरमधील कलम 370 हटविण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

दिल्ली (Dehli) : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांची मंगळवारी रात्री कैदेतून सुटका करण्यात आली. कैदेतून सुटताच मेहबुबा यांनी काश्मीरमधील कलम 370 हटविण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत (पीएसए) त्यांना नजरकैदेत ठेवले होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मंगळवारी त्यांची सुटका करण्यात आली. कैदेतून सुटताच मेहबुबा यांनी पुन्हा एकदा काश्मिरी राग आळवला आहे. कलम 370 हटविण्याचा निर्णय हा एक काळा निर्णय आहे. त्याविरोधात संघर्ष सुरूच राहील, असे त्या म्हणाल्या. मेहबुबा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यात त्या म्हणतात, तब्बल एक वर्षाहून अधिक काळानंतर माझी सुटका झाली आहे. 5 ऑगस्टच्या काळ्या दिवशी भारत सरकारने घेतलेला काळा निर्णय सतत माझ्या मनावर आघात करत होता. जम्मू-काश्मीरच्या जनतेची मनस्थितीही तीच असणार असे मला वाटते. तो अपमान कोणीही विसरू शकणार नाही.

निर्णय बेकायदा
केंद्र सरकारने बेकायदा आणि लोकशाही विरोधी पद्धतीने आपला हक्क काढून घेतला आहे, तो पुन्हा मिळवावा लागेल. ज्या काश्मीरसाठी हजारो लोकांनी बलिदान दिले, तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरूच राहील, असेही त्या म्हणाल्या. जम्मू-काश्मीरमधील जितके लोक देशातील विविध तुरुंगांत आहेत, त्यांची लवकरात लवकर सुटका केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक
महबूबा मुफ्ती यांनी नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर बुधवारी आपल्या निवासस्थानी पक्षाच्या अन्य नेत्यांची बैठक घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, मेहबुबांच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर 15 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती. राज्यातील राजकारणाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे एक मोठे पाऊल म्हणून मेहबूबांच्या सुटकेकडे पाहिले जात आहे. राज्यात लवकरच पंचायत पोटनिवडणुका होणार आहेत. कैदेतून सुटका झाल्यावर मेहबुबांनी आपल्या वक्तव्याद्वारे पक्षाचा अजेंडा जाहीर केला आहे.