प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

देशातील पर्वतीय प्रदेशांमध्ये सध्या हिमवृष्टी सुरू आहे. याचा परिणाम मैदानी क्षेत्रात जाणवत आहे. संपूर्ण उत्तर भारतासह मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या भागात थंडीचा कडाका वाढत आहे. आगामी नववर्षाचा जानेवारी महिना ‘जानेवारी कोल्ड’ नावाने ओळखला जाईल. 

दिल्ली (Delhi).  देशातील पर्वतीय प्रदेशांमध्ये सध्या हिमवृष्टी सुरू आहे. याचा परिणाम मैदानी क्षेत्रात जाणवत आहे. संपूर्ण उत्तर भारतासह मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या भागात थंडीचा कडाका वाढत आहे. आगामी नववर्षाचा जानेवारी महिना ‘जानेवारी कोल्ड’ नावाने ओळखला जाईल.

हवामान विभाग तज्ज्ञ कैलाश पांडे यांच्या मते, जानेवारी-2021 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेेत जास्त थंडी असेल. जानेवारी महिन्यात एकूण 12 दिवस थंडीचा प्रखर तडाखा जाणविणार आहे. यापैकी 8 दिवस दाट धुके आणि 4 दिवस प्रचंड थंडीचे असू शकतात. तापमान 16 डिग्री सेल्सिअसपेक्षाही नीचांक पातळीवर जाऊ शकते. यामुळे नागरिकांमध्ये डायरिया, ताप, सर्दी, खोकला आणि लागट रोगांचे प्रमाण वाढू शकते.

तापमान २ ते ३ डिग्रीपेक्षाही नीचांकी गाठणार
हवामान विभागानुसार सध्या जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी सुरू आहे. यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये तापमान 2 ते 3 डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी होऊ शकते. दृश्यता कमी झाल्याने याचा विपरीत परिणाम रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक सेवांवर होऊ शकतो. दिल्लीत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचीही शक्यता आहे. थंड वारे वाहू लागल्याने रात्रीचे किमान तापमान 3.3 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जाऊ शकते.

दिल्लीत मागील 5 वर्षांत 13 डिसेंबरचा दिवस सर्वांत थंड दिवस राहिला. लेहमध्ये पारा -2.2 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला. कारगिलमध्ये तापमान शून्य ते -5.6 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली गेले. उत्तराखंडमधील उत्तर काशी, चमोली, रुद्रप्रयाग आणि पिथौरागड येथील उंच भागात रात्रीचे तापमान शून्य अंशापर्यंत खाली आले होते. देशातील मैदानी प्रदेशातसुद्धा थंडीचा पारा चांगलाच खालावलेला आहे.